Saturday, July 31, 2021
spot_img
HomeMain-sliderअट्टल दुचाकी चोरटे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात।

अट्टल दुचाकी चोरटे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात।

जळगाव / दुचाकींची चोरी करून त्या कमी किंमतीत विकणार्‍या भामट्यांच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आडगाव, भडगाव तालुक्यातील पथराड येथून आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाक्या हस्तगत केल्या आहेत.

दुचाकी चोरी प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात दोन तर रामनंद नगर,धुळे शहर व मालेगाव छावणी पोलिसात गुन्हा दाखल आहे.हेमंद उर्फ हिंमत पाटील (26),रामकृण उर्फ रोहित संभाजी पाटील(29,दोन्ही रा.आडगाव, ता.एरंडोल)आणि जगदीश बाळू शेळके (रा.पथराड, ता.भडगाव) अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत.

गोपनीय माहितीवरून अटक एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील संशयीत आरोपी हिंमत पाटील हा चोरीच्या दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दादाभाऊ पाटील,नंदलाल पाटील,किरण धनगर,प्रमोद लाडवंजारी,भगवान पाटील,सचिन महाजन,अशोक पाटील,दीपक चौधरी,भारत पाटील आदींनी मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यास चोरीच्या दुचाकीसह अटक केली.

आरोपीने आपले साथीदार रामकृण उर्फ रोहित संभाजी पाटील (29,रा.आडगाव,ता.एरंडोल) आणि जगदीश बाळू शेळके (पथराड,ता.भडगाव) यांचे नावे सांगताच त्यांना अटक रकण्यात आली.संशयीत आरोपी जगदीश बाळू शेळके याच्यावर दुचाकी चोरी आणि आर्म अ‍ॅक्टनुसार पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील कारवाईसाठी त्याला भोसरी पोलीसांनी ताब्यात घेतले तर उर्वरीत दोघांना चाळीसगाव दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

प्रतिनिधि / प्रदीप देशमुख जिल्हा जळगाव

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love