Friday, September 24, 2021
spot_img
HomeEducationआई-वडील व गुरूजनाचा आदर ही भारतीय संस्कृती - डाॅ.रामप्रसाद लखोटीया

आई-वडील व गुरूजनाचा आदर ही भारतीय संस्कृती – डाॅ.रामप्रसाद लखोटीया

उदगीर प्रतिनीधी:-
गुरु शिष्य या परंपरेला आपल्या भारतीय संस्कृती मध्ये खुप म्हत्वाचे स्थान आहे.जीवनातील आई – वडिलांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही,कारण तेच आपल्याला लहान पनापासुन जिवनात या रंगबेरंगी सुंदर अशा जग दाखवतात.आणि तेच आपल्या जिवनातील पहीले प्रथम गुरु.तरी शिक्षक हे आपल्याना जीवनाचा खरा अर्थ शिकवतात जीवनात योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतात, शिक्षक दिना निमीत्त
अरूना अभय औसव्वाल अंध शाळेत डाॅ.रामप्रसाद लखोटीया बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रेमदास चव्हाण सर होते.तर मंचावर उपस्थीत डाॅ.रामप्रसाद लखोटीया,डाॅ.आर्चणा पवार,डाॅ.योगीता मॅडम,प्रा.राजेद्र चव्हाण उपस्थीत होते.
उपस्थीत माण्यवरांचा सत्कार आयोजका च्या वतिने करण्यात आला.पुढे बोलताना भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनादिवसी शिक्षकांच्या प्रति सन्मान करण्यासाठी सर्व भारत भरात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षणा मधे खूप विश्वास ठेवत होते. ते ही एक महान तत्वज्ञ आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणा बाबतीत खुप लळा होता. एका आदर्श शिक्षकाचे सर्व गुण त्यांच्यामध्ये होते. या दिवशी देश भरात भारत सरकारच्या वतीने श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतात.
शाळा कॉलेज सोबत अन्य संस्थानामध्ये सुद्धा विविध कार्यक्रम केले जातात. काही शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम राबवले जातात. शिक्षक गुरु – शिष्य परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प केले जातो
यावैळी एस.एस.पाटील,गणेश मुंडे,रेखा माने,अजय भालेराव ,उमादेवी भोसले ,आदीसह विद्यार्थी सामाईक अंतर राखुन उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश अनमुलवार यांनी तर अभार रोहीदास कांबळे यांनी मानले

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love