Sunday, August 1, 2021
spot_img
HomeMain-sliderआघाडी सरकारमधील शाब्दिक चकमकिवर अनिल गोटेन्चे पत्र विरोधकांसह सत्ताधारींवर निशांणा,

आघाडी सरकारमधील शाब्दिक चकमकिवर अनिल गोटेन्चे पत्र विरोधकांसह सत्ताधारींवर निशांणा,

धुळे / राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते टोलेबाजी करत आहेत.यातच धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी पत्रक काढून महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांतील वादग्रस्‍त वक्‍तव्‍य करणाऱ्या नेत्यांची कानउघाडणी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये दुधपुर सुरू असल्याचे उघडपणे दिसून येत आहे.आज शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याबाबत व काँग्रेस पक्षाच्या इतर नेत्यांबाबत ज्या पद्धतीने टोलेबाजी करण्यात आली आहे.

अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या व महाविकास आघाडी पक्षातील इतर नेत्यांच्या तोंडून देखील विविध प्रकारची वादग्रस्त वक्तव्य सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.यावर धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी एका परिपत्रकामधून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षाचा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

सत्‍ताधारींसह विरोधकांनाही टोला सत्‍तेत येण्यासाठी बळजबरी नाही तसेच आघाडी सत्तारूढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करीत आहेत.आघाडीत असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत एकत्र आले आहेत.कुणीही कुणाला बळजबरी केलेली नाही.

ती जबाबदारी आपण स्वईच्छेने स्वीकारली आहे.असं म्हणत सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीतील एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची गोटे यांनी चांगलीच कानउघाडणी या पत्रकातून केले असल्याचे दिसून येत आहे.

प्रदीप देशमुख भुसावळ

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love