Saturday, July 31, 2021
spot_img
HomeMain-sliderआमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते OBC मोर्चा युवा अध्यक्ष पदी संतोष राठोड...

आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते OBC मोर्चा युवा अध्यक्ष पदी संतोष राठोड नियुक्तीपत्र देऊन सन्मानित.

जिंतूर/जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते तालुक्यातील बंजारा समाज ओबीसी चे युवा नेते तथा उपसरपंच संतोष राठोड यांना ओबीसी मोर्चा तालुका युवा अध्यक्ष पदी निवड करून त्यांना आज दि.20 जुलै रोजी आमदार निवासात अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थित नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

जिंतूर सेलू विधानसभेच्या भाजप आमदार सौ. मेघना सकोरे (बोर्डीकर) यांनी बंजारा ओबीसी नेते तथा उपसरपंच संतोष राठोड यांना ओबीस मोर्चा तालुका युवा अध्यक्ष पदांच्या नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करून आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की ओबीसी नेते संतोष राठोड मागील अनेक वर्षांपासून बंजारा ओबीसी समाजाच्या विकासासाठी काम करत आहे.

त्यामुळेच त्याना हे पद देण्यात आले आहे.त्यामुळे ते अता निश्चितच येणाऱ्या काळात ओबीसी,वंचित तळागाळातील घटकातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील असे मला विश्वास आहे.यावेळेस मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कोंडगे,भाजप जिल्हा अध्यक्ष डॉ सुभाषजी कदम,किसान मोर्चा प्रदेश चिटणीस रंगनाथ सोळंके,माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष,डॉ.पंडित दराडे बाळासाहेब जोगदंड तालुका अध्यक्ष भाजपा,दगडोबा जोगदंड पाटील तालुका अध्यक्ष किसान मोर्चा,दत्ता रघुनाथ गिरी,सुमेध सूर्यवंशी, माजी सरपंच माऊली तुरे आदी मान्यवर मंडळींनी ओबीसी नेते संतोष राठोड यांचा अभिनंदन व कौतुक केले. यावेळेस आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगीतले कि ओबीसी समाजातील विविध प्रश्नांवर काम करूण ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी संतोष राठोड निश्चितच काम करतील असे सांगितले.

प्रतिनिधी-सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love