Monday, August 2, 2021
spot_img
HomeMain-sliderआषाढी एकादशी निमित्त शोभायात्रा व दिंडीने वेधले बोरीकरांचे लक्ष टाळ,मृदंग व विणेच्या...

आषाढी एकादशी निमित्त शोभायात्रा व दिंडीने वेधले बोरीकरांचे लक्ष टाळ,मृदंग व विणेच्या गजराने भक्तजन झाले बेभान।

जिंतूर/तालुक्यातील बोरी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्सवात टाळ मृदंग व विणेच्या गजरात गावातुन वाजत गाजत विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीची शोभा यात्रा काढण्यात आली होती.या भक्तीरुपी दिंडीत वारकरी संप्रदाय भजनी मंडळ,महिला वर्ग व टाळ,मृदंग व विणेचे वाजत्री मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

कोरोना सावटा मुळे विठ्ठल भक्तांना या वर्षी सुद्धा दर्शनासाठी पंढरपूरवारी करता आली नाही.पण तरीही हा उत्साह कुठेही कमी न होऊ देता गावातील विठ्ठल रुख्मिनी मंदिराची रंगरंगोटी करून देखणी सजावट मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती.

गावातील सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहणाऱ्या आशाताई गायकवाड व अन्य महिलांनी व भाविक भक्तांनी एकत्र येत पुढाकार घेऊन हा कार्यक्रम साजरा करत दरवर्षीचा भक्तांचा उत्साह कुठेही कमी न होऊ देता पार पाडला.

सदर कार्यक्रमात प्रथम तुळशी वृन्दावन सजावट,टाळ,मृदंगाच्या व विणेच्या गजरात भव्य शोभा यात्रा मुख्य मार्गावरून काढण्यात आली.दिंडीचे जागोजागी स्वागत करण्यात आले.सहभागी दिंडीकरा साठी ग्रामस्था तर्फे विविध ठिकाणी फराळाची सोय करण्यात आलेली होती.

विठ्ठल रुख्मिनी मंदिरात भाविक भक्तां साठी आशाताई गायकवाड,विष्णू चौधरी व बापूराव गायकवाड यांच्या तर्फे अन्नदानाची व्यवस्था करण्यात आलेली होती.गुलाबराव महाराज,अंकुशराव चौधरी यांचा दिंडीत विशेष सहभाग होता.मिराताई चौधरी,चंद्रकलाताई चौधरी,रंजनाबाई गायकवाड,शांताबाई बेनुरे आदीं महिलाचा यात सहभाग होता.

चौकट-आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या या दिंडीत विशेष लक्ष वेधले ते आशाताई गायकवाड व बेबीनंदा चौधरी यांनी रिंगण करून केलेल्या फुगडीने सर्वांचे लक्ष वेधले होते.दरवर्षीची ही परंपरा खंडित पडू दिली नाही.

प्रतिनिधी- सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love