Friday, September 24, 2021
spot_img
HomeMain-sliderउदगीरच्या ऐतिहासिक किल्ला दुरुस्तीसाठी सुमारे 4 कोटी 88 लाखाचा निधी मंजूर

उदगीरच्या ऐतिहासिक किल्ला दुरुस्तीसाठी सुमारे 4 कोटी 88 लाखाचा निधी मंजूर

उदगीर, (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील ऐतिहासिक, पुरातन महत्व असलेल्या व उदगीरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या उदागीर बाबाची समाधी असलेल्या किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी उदगीर चे आमदार तथा पर्यावरण पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुमारे 4 कोटी 88 लाखाचा निधी मंजूर झाल्याचे कळविण्यात आले आहे.

किल्ल्याची अनेक वर्षापासून दुरावस्था झाली होती या किल्ल्याची दुरुस्ती करण्याची मागणी उदगीरकरां मधून केली जात होती ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पाठपुरावा करून किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला.

या निधीच्या माध्यमातून किल्ल्याच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल तयार करणे, पुरातत्व संकेतनुसार उत्खनन करणे, किल्ल्याच्या तटबंदीची झाडेझुडपे काढणे, पडझड झालेल्या वास्तू च्या भिंतीची दुरुस्ती करणे, पर्यटकांच्या वाहन करता पार्किंग व्यवस्था यासह स्मारकांचे जतन व दुरुस्तीची कामे समाविष्ट आहेत.

पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये शासन दरबारी हा प्रश्न पाठपुरावा करून उदगीरकर यांची अनेक वर्षांपासून असलेली मागणी मान्य केल्यामुळे उदगीरकरांन मध्ये आनंदाचे वातावरण आहे पर्यावरण पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love