Tuesday, August 3, 2021
spot_img
HomeMain-sliderउदगीर येथे नालीत ५०० रूपयांच्या नोटांचा पूर,

उदगीर येथे नालीत ५०० रूपयांच्या नोटांचा पूर,

लातुर/ जिल्ह्यातील उदगीर शहरातील बिदर रोडवर असलेल्या रघुकुल मंगल कार्यालयासमोरील नाली मधून पाचशे रुपयांच्या अनेक नोटा वहात असल्याचे पाहून नागरिकांनी त्या नोटा मिळवण्यासाठी एकच गर्दी केली.दरम्यान कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या नोटा ताब्यात घेतल्या.
बँका अधिकार्‍यांशी संपर्क करून सदरील नोटांच्या अनुषंगाने नोटा चलनातील आहेत की बाद झालेले आहेत? की बनावट आहेत? यासंदर्भात माहिती घेतली असता,सदरील नोटा चालू चलनातील असून त्या नोटांना वाळवी लागल्यामुळे कोणीतरी त्या टाकून दिल्या असाव्यात किंवा कोणाच्या तरी नजरचुकीने त्या नालीत पडल्या असाव्यात. अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.या संदर्भात अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

जिल्हा प्रतिनिधी:खदीर विटेकर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love