Thursday, August 5, 2021
spot_img
HomeMain-sliderउपजिल्हा रुग्णालयात न्यूमोनिया लस उपलब्ध पालकांनी बालकाना लस देऊन संरक्षित करावे

उपजिल्हा रुग्णालयात न्यूमोनिया लस उपलब्ध पालकांनी बालकाना लस देऊन संरक्षित करावे

राजुरा/राजुरा उपजिल्हा रुग्णालयात निमोनिया लसीकरणाची सुरुवात झाली असून दीड महिन्यावरील बालकांना हि लस घेता येईल करिता तालुक्यातील नागरिकांनी आपल्या बाळांना या लसीचे डोज देऊन संरक्षित करावे असे आव्हान रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एल.टी.कुळमेथे यांनी दि.१७ रोजी झालेल्या लसीकरण मार्गदर्शन उदघाटन प्रसंगी केले आहे.

छोट्या बालकांना श्वसनाचे आजार होऊ नये म्हणून CPV देण्यात येते नवजात बालके (दीड महिना) याना हि लस दिल्यास त्याचे निमोनिया या आजारापासून संरक्षण होते.निमोनिया हा श्वसन प्रक्रियेत होणार आजार आहे त्यामुळे बालक संक्रमित झाल्यास बालक दगावू शकते त्यामुळे बालकांना संरक्षित करण्याचे दृष्टीने CPV लस राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच उपलब्ध झाली असल्याचे डॉ.एल.टी.कुळमेथे यांनी उपस्थित बालकांच्या मातापित्यांना मार्गदर्शन करताना सांगितले या PCV निमोनिया लसीकरण मार्गदर्शन कार्यक्रमासाठी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ.उमाकांत धोटे वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.डी.अरके,मॅडम डॉ.आर.ए.यादव,डॉ.गायकवाड मॅडम डॉ.अमित चिदंमवार,डॉ.सुरेंद्र डुकरे,श्री.डी.एम वाघ,मनोज एन ताजने परीसेवीका महुआ चौधरी,लता धानोरकर,भारती रामटेके हे प्रामुख्याने उपस्थिती होते.

प्रतिनिधि/संजय रामटेके डेली खबर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love