Sunday, August 1, 2021
spot_img
HomeMain-sliderउपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे लातूर शहर यांचे विशेष पथकाची धडाकेबाज कामगिरी।

उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे लातूर शहर यांचे विशेष पथकाची धडाकेबाज कामगिरी।

लातूर/लातूर शहरातील चोरी गेलेल्या 19 मोटार सायकली किंमत 11,15,000/-चा मुद्देमाल जप्त व दोन आरोपी गजाआड उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर येथील कार्यरत असलेल्या विशेष पथकानेलातूर शहरात वाढत असलेल्या वाहन चोरी बाबत विशेष मोहीम आखून त्याबबात नियोजन केले.विशेषपथकाने गुप्त बामतीदाराची नेमुणक करुन गुप्त बातमीच्या आधारे आज रोजी राजे शिवाजीनगर,(बसवाडी)लातूर येथे.

सापळा लावून आरोपी नामे अविनाश ऊर्फ बापु तानाजी येमगर,वय 27 वर्षे,रा.रामवाडी,ता.जि.उस्मानाबाद ह.मु.राजे शिवाजीनगर,लातूर ब आरोपी नामे मच्छिद्र दत्तात्रय क्षिरसागर,वय 25 वर्षे,रा.किल्लारी,ता.औसा, जि.लातूर ह.मु.वाल्मीकीनगर,लातूर यांना राजे शिवाजीनगर,(वसवाडी) लातूर येथे दोन चोरीच्या मोटार सायकलसह रंगेहात पकडुन त्याचे कडे चौकशी केली असता.

त्यानी सदर मोटार सायकल चोरीचे असल्याचे सांगितले. त्यावरुन त्याना विश्वासात घेऊनविचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की,लातूर शहर,मरुड,औसा,येथून मोटार सायकल चोरल्याचेकबुली देऊन एकूण 19 मोटार सायकल किमत 11,15,000/-(अकरा लाख पंधरा हजार) रुपयेचामुद्देमल हस्तगत करण्यात आला आहे.त्यांचेकडे अधिक विचारपूस केली असता.

त्यांनी त्यांचे इतरदोन साथीदार 1) तुकाराम मनोहर कुंभार,रा.हारेगाव ता.औसा जि.लातूर ह.मु राजे शिवाजी नगर,(वसवाडी-लातूर 2) सुनिल ऊर्फ बाळा वसंत कोळपे रा.तेर ता.जि.उस्मानाबाद हे दोघे फरार आहेत त्यांचा शोध घेणे चालू आहे. सदरचे गुन्हे हे वरील चौघांनी मिळून मोटार सायकल चोरी केलेले आहेत.सदर चारही आरोपी मोटार सायकल चोरीचे सवईचे आहेत.

मोटार सायकलची खात्री केली असतापो.स्टे एम.आय.डी.सी,पो.स्टे विवेकानंद चौक,पो.स्टे शिवाजी नगर,लातूर पो.स्टे मुरुड,पो.स्टे औसायेथे गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगीरी मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.हिम्मत जाधव,यांचे मार्गदर्शना खाली उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री.जितेद्र जगदाळेयांचे विशेष पथकातील पो.उप.नि.किरण पठारे,सहायक पोलीस उपनिरीक्षक वाहीद शेख,पो.हे.कॉ./रामचंद्र ढगे,पो.ना./महेश पारडे, पो.ना./अभिमन्यु सोनटक्के,पो.कॉ./गणेश मोरे,पो.कॉ/सोमनाथ खडके,यांनी सदर मोटार सायकल चोरी करणारी टोळी उघड करुन मुद्देमाल जप्त केला आहे.

लातूर पोलीस दलाचे वतीने नागरिकांना अवाहन करण्यात येते को,नागरीकांनी आपल्या मोटारसायकली सुरक्षित ठिकाणी हॅन्डल लॉक करुन लावाव्यात तसेच जुने वाहन खरेदी विक्री करताना यची पाहणी करुनच व्यवहार करावा.संशयीत वाहन निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

प्रतिनिधी : खदीर विटेकर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love