Tuesday, August 3, 2021
spot_img
HomeMain-sliderऑनलाईन परिक्षेचा पहिल्याच दिवशी विद्यापीठाचा सावळा गोंधळ,

ऑनलाईन परिक्षेचा पहिल्याच दिवशी विद्यापीठाचा सावळा गोंधळ,

नेटवर्क व विद्यापीठाच्या सर्वर डाऊन होत नसल्यामुळे समस्या 

लातूर/लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बी.ए,बी.कॉम,बी.एस्सी.तृतीय वर्षाच्या परिक्षा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या  उन्हाळी २०२१ च्या परिक्षा दि.१३ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरु झाली होती पण.तालुका परिसरातील व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पदवी च्या विविद्य शाखेच्या ऑनलाईन परिक्षा देत असताना त्यांना आनेक अडचणीचा सामना करावा लागला त्यात लॉगींन न होणे,जर एखादया विद्यार्थ्याचे लॉगींन झालेच तर एकादे दोन प्रश्न सोडवीले की परिक्षा संपली असा मॅसेज येत होता.त्या बरोबरच विधापीठाचे सर्वर व्यवस्थीत चालत नसल्यामुळे हँग होत होते.त्यामुळे विद्यार्थ्याना व पालकांना मानशिक त्रासाचा सामना करावा लागला.

ऑनलाईन परिक्षा व्यवस्थीत होत नसल्यामुळे येथील शिवनेरी महाविद्यालयातील तिन्ही शाखेच्या विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ ओमप्रकाश जाधव व परिक्षा समन्वयक प्रा.मलिकार्जून वाकडे यांच्या कडे चौकशी करण्यासाठी धाव घेऊन निवेदन दिले.परिक्षा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन विद्यापीठाने घ्यावे असे निवेदनात देऊन म्हटले आहे.ऑनलाईन परिक्षा न घेता ऑफ लाईन परिक्षा घेऊन विद्यार्थ्याचे होणारे शैक्षणीक नुकशान टाळावे अशी मागीन पालक शेख महेताब यांनी प्राचार्याकडे केली  आहे.

जिल्हा प्रतिनिधी : खदीर विटेकर,लातूर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love