Friday, September 24, 2021
spot_img
HomeMain-sliderऔट्रम घाटाचा भार तलवाडा घाट वाहतूक वारंवार जाम, वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष,...

औट्रम घाटाचा भार तलवाडा घाट वाहतूक वारंवार जाम, वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष, वाहन चालकांना मनस्ताप

औरंगाबाद: रस्त्याच्या मधोमध तीन मालवाहू ट्रक बंद पडल्याने औरंगाबाद-मालेगाव महामार्गावरील तलवाडा घाटातील वाहतूक दि.१२ रविवार रोजी तब्बल तीन तास ठप्प होती.त्यामुळे ४०० ते ५०० वाहने एकाच रांगेत उभी होती. काही काळापुरता ‘वन वे’ ट्रॅफिक सुरू झाल्याने तासंतास अडकून पडलेल्या प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला.

दुचाकीस्वारांना एक साइड खुली करून सोडण्यात येत होते.दरम्यान, ही वाहतुक सुरळीत करण्यासाठी शिऊर पोलीसांना अक्षरशा: दमछाक झाली. दोन आठवड्यापासून वारंवार घाट जाम होण्याच्या प्रकारामुळे घाटातील वाहतुकच बंद पडण्याची भिती व्यक्त होत आहे.

औरंगाबाद-मालेगाव महामार्गावरील तलवाडा ते कासारी दरम्यान सुमारे ४ किमीचा घाट आहे. या महामार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांसह लहान मोठी वाहने धावत असतात. मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव व मनमाड जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोईचा असल्याने या मार्गाने अवजड वाहतूक अधिक प्रमाणावर धावत असते.

मात्र, तलवाडा घाटातील धोकादायक खड्डे, अरूंद रस्ते, त्यात पावसामुळे पडलेले मोठे खड्डे यामुळे घाटातून वाहन चालवणे म्हणजे यमराजाच्या दरबारात चालण्यासारखे आहे. थोडाजरी संयम ढळला तरी वाहन घाटात खोल दरीत गेलेच समजा. तलवाडा घाटातील खड्ड्यांमुळे वाहने चालवतांना अत्यंत जिकरीचे ठरत आहे. खड्डे टाळण्याच्या नादात वाहनांवरील ताबा सुटून अपघात वाढले आहे.

चौकट

तलवाडा घाटाची गेल्या अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली असतांना देखील महामार्ग प्राधिकरणाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.वाहनधारकांचा जीव अक्षरशा टांगणीला लागलेला आहे.घाटात प्रवेश करताच क्षणी यमराज पाठीशी लागला की काय अशी अवस्था वाहनधारकांची होते.वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा मार्ग असून देखील त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष दिवसेंदिवस वाहनधारकांना महागात पडत आहे.

दोन आठवड्यात पाचवी घटना

या आठवड्यात तलवाडा घाटात पाचव्यांदा वाहतूक जाम झाली आहे. सातत्याने होणाऱ्या पावसामुळे घाटात जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे घाटातच वाहने नादुरूस्त पडून वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रकार वाढले आहे. परिणामी घाटातील वाहतुक दोन्ही बाजुंनी जाम झाली. कित्येक तास वाहनधारकांना घाटातच अडकून पडून राहावे लागले. लहान मुले, महिला यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. वाहतुक सुरळीत होत नाही तोपर्यंत घाटातच वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन थांबावे लागते.

शिऊर पोलीसांची तत्परता

जाम झालेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी सातत्याने शिऊर पोलिस प्रयत्नशील असतात. शनिवारी सकाळ पासून पुन्हा घाटातील वाहतुक जाम झाली होती. पोलीसांनी ही वाहतुक एकेरी मार्गाने सुरु करुन घाटातील कोंडी फोडली.

वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष

तीन आठवड्यापासून सोलापुर धुळे महामार्गावरील वाहतूक तलवाडा घाटामार्गे वळवण्यात आली. मात्र वाहतूक पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने पाचव्यांदा गाड्या नादुरुस्त होऊन तब्बल सात सात तास ट्राफिक जाम झाल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद ब्युरो चीफ हसन सैय्यद लोणीकर

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love