Monday, August 2, 2021
spot_img
HomeMain-sliderकिरकोळ कारणावरून एकाला मारहाण:गुन्हा दाखल,

किरकोळ कारणावरून एकाला मारहाण:गुन्हा दाखल,

रावेर / तालुक्यातील धानवड येथे दारूच्या नशेत असणाऱ्या व्यक्तीला मस्करी न करण्याच्या कारणावरून एकाला तीन जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की,धनराज तुकाराम जोगी रा.धानवडता.जि.जळगाव हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे.त्यांच्या गल्लीत राहणारा भागवत दगा जोगी हा १३ जुलै रोजी दुपारी १ वाजता दारू पिऊन घरी आला.त्यावेळी धनराज जोगी यांच्या पत्नीशी मस्करी करू लागला.दरम्यान धनराज जोगी व त्यांची पत्नी यांनी मस्करी न करण्याचे सांगितल्याचा राग भागवत जोगी याला राग आल्याने त्यांच्यासह त्याचे दोन्ही मुले छोटू आणि गणेश भागवत जोगी यांनी पती पत्नीस लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली.या प्रकरणी धनराज जोगी यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे.

प्रदीप देशमुख जिल्हा जळगाव

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love