Monday, August 2, 2021
spot_img
HomeMain-sliderकुंटणखाना उद्ध्वस्त,दोघांना अटक:गुन्हा दाखल,

कुंटणखाना उद्ध्वस्त,दोघांना अटक:गुन्हा दाखल,

पिंप्राळा/प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा हुडको रस्त्यावर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना गजाआड केले आहे.रामानंदनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,पिंप्राळा हद्दीत असलेल्या हुडको रस्त्यावर महादेव मंदीराजवळ कुंटणखाना सुरु असल्याची गुप्त माहिती पो.नि.अनिल बडगुजर यांना मिळाली होती.या अनुषंगाने पोलीस पथक तयार करण्यात आले.या पथकाने एक पंटर कुंटणखान्यावर पाठविला.

त्याने तेथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मोबाईलवरून देताच पोलिस पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकला.या छाप्यात संबंधीत कुंटणखाना दयावान बैरागी व त्याची बहिण मिळून चालवत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला स.पो.नि.संदीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम ३,४,५,७ (१) (ब) अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप देशमुख भुसावळ

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love