Wednesday, August 4, 2021
spot_img
HomeMain-sliderकुरंगी येथे निराधार आश्रमाचे भूमिपूजन

कुरंगी येथे निराधार आश्रमाचे भूमिपूजन

कुरंगी तालुका पाचोरा येथे निराधार आश्रमाचे भूमिपूजन करण्यात आले.धर्मराज जनसेवा बहुउद्देशीय फाऊंडेशनच्यावतीने निराधार आश्रमाचे नियोजन करण्यात आले.यासाठी संस्थेचे अध्यक्ष व माध्यमिक व उच्चमाध्यमिक कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार यांनी संस्थेला एक एकर जमीन दान केली.

धर्मराज जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने निराधार आश्रम फक्त एक सुरुवात आहे.यानंतर लवकरच विभिन्न ठिकाणी निराधार आश्रमाचे नियोजन करण्यात येईल असे संस्थेचे सचिव शिवराणा व्याख्याते डॉ संतोष पाटील गोराडखेडेकर यांनी बोलून दाखविले.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक रामचंद्र पवार,शालीक पवार,रंभाआई पवार,डॉ सूर्यकांत पवार व सौ अनिता पवार,देविदास पाटील,विलास बारेला,लोकेश पवार,रतीलाल बारेला,अनिल पाटील,दिनेश बारेला यांची उपस्थिती होती.याप्रसंगी सूत्रसंचालन डॉ नीलेश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ पवार यांनी केले.

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love