Friday, September 24, 2021
spot_img
HomeMain-sliderगावठाण,गायराणासह,खाजगी शेत़जमिनीची शासकीय मोजणी करा छावा संघटना

गावठाण,गायराणासह,खाजगी शेत़जमिनीची शासकीय मोजणी करा छावा संघटना

वैजापूर/वैजापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी गावठाण, गायराणासह खाजगी शेतजमिनीचे वादग्रस्त प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे अनेक गावांमध्ये अप आपसातील वाद विकोपाला गेले अनेकांनी आपले जीव गमावले, अशा प्रकारांमुळे महसूल विभाग, पोलीस ठाण्यात, न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असल्याने शासकीय यंत्रणेवर व गावपातळीवरील ग्रामपंचायतीवर जास्तीचा भार पडतो, शासकीय यंत्रणेचा वेळ वाया जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

शासकीय मोजणी केल्यास अतिक्रमण झालेले गावठाण, गायराणासह खाजगी शेतजमिनीचे क्षेत्र मोकळे होतील.तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळेल.असा आशावाद असल्याने अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर मगर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे निवेदनाद्वारे मोजणीची मागणी केली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भागिनाथ दादा मगर, पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र मगर, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती संजय निकम, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष सुर्यवंशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव निकम, कैलास पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

औरंगाबाद ब्युरो चीफ/ हसन सैय्यद लोणीकर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love