Wednesday, August 4, 2021
spot_img
HomeMain-sliderग्रामिण युवकांची स्वंयरोजगार निर्मित करीता कृषी विज्ञान केंद्राला भेट,डॉ रवींद्र काळेंनी केले...

ग्रामिण युवकांची स्वंयरोजगार निर्मित करीता कृषी विज्ञान केंद्राला भेट,डॉ रवींद्र काळेंनी केले मार्गदर्शन।

वाशिम/दिवंसेदिवस शेतीवरील वाढता खर्च व मिळणारे उत्पन्न कमी होत असल्याकारणामुळे शेती नपरवडणारी झाली आहे. शेतीतील खर्च कमी करता यावा व शेती पुरक व्यवसायामधून स्वयं रोजगारा सोबतच इतरांना रोजगार निर्माण करता यावा या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्राला मौजे वडजी येथील ग्रामीण युवकांनी दि 19 जुलै 2021 रोजी भेट दिली.

मौजे वडजी ता.रिसोड जि.वाशिम हे गाव कृषी विज्ञान केंद्राने तांत्रिक सहकार्या करीता हे गाव दत्तक घेतले असुन येथिल काही अल्पभुधारक ग्रामिण युवकांनी कृषी विज्ञान केंद्राचे फळबाग तज्ञ श्री निवृत्ती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फळबागेची लागवड केली आहे.

फळबाग हे वर्षातून एकदाच देणारे उत्पन्नाचे स्त्रोत असल्याने ग्रामिण युवक शेती मध्ये आंतर पिक पदधतीचा अवलंब करतात जे तांत्रिक दृष्ट्या दोन वर्षानंतर योग्य नाही.शेती सोबतच शेती निगडित जोड धंदे करता येवु शकतात का या उदेश्याने मौजे वडजी येथिल अल्पभुधारक ग्रामिण युवकांनी केंद्राला भेट दिली.

भेटी दरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.रविंद्र काळे यांनी शेती निगडित उदयोग एकात्मीक शेती संकल्पनेच्या माध्यमातुन खालावत असलेले मानवी आरोग्य व जमिनीचे आरोग्य निरोगी व अबाधीत ठेवुन ग्रामिण युवकाला प्रति महिना 10 ते 15 हजार रुपये मिळता येतील यावर सविस्तर मार्गदर्शन केले. 

आज ग्रामीण भागामध्ये कमी होत असलेल्या जनावराच्या संख्या मुळे मानवी आरोग्याला लागणारे दुध,दही,ताक व तुप तसेच जमिनीचे आरोग्या करीता सेंद्रिय कर्बाचे कमी होत असलेले प्रमाण हे सर्व भरून काढण्याकरिता ग्रामीण युवकांनी या प्रकल्प सुरु करावा असे आव्हान केले.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्रावर उभारलेल्या एकात्मीक शेती प्रकलपाची पाहणी करत असतांना प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रमोद देशमुख यांनी अंडी उत्पादन,मासल कोंबडी पालन,दुग्ध व्यवसाय,गांडूळ खत निर्मिती,व्हर्मीवाश निर्मिती,शेळी पालन,जिवामृत निर्मिती,नॅडेप कंम्पोस्ट तंत्रज्ञान,दशपर्णी अर्क निर्मिती,निंबोळी अर्क व तसेच जनावरांना लागणा-या चारा निर्मितीमध्ये मुरघास,हॅड्रोफोनिक व अॅझोला निर्मिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातुन उदाहरणासहित स्पष्ट केले.

मौजे वडजी येथिल अतुल सरनाईक,इस्माईल पठाण,अनिरुद्ध बाजड,संदीप बोरकर,अनिल बोरकर,गजानन शेजूळ,सुरेश बाजड,आरिफ पठाण,संतोष बाजड,अजय बोरकर,शिवाजी शेजूळ या ग्रामिण युवकांनी या प्रकल्पाची पाहणी केल्या नंतर अश्या प्रकारचा प्रकल्प ग्रामिण युवकांच्या जिवनामध्ये नव चैतन्य निर्माण करुन शेती मधील खर्च कमी करण्यासोबतच स्वयं रोजगार निर्माण करू शकतो अशी प्रतिक्रिया देऊन तज्ञाचे आभार मानले व वडजी येथे प्रकल्प उभे करण्याचा संकल्प घेतला.

वाशिम/रवि अंभोरे

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love