Wednesday, August 4, 2021
spot_img
HomeMain-sliderचळवळ राबवुन प्रत्येकाने लसीकरण पुर्ण करावे : रवि शिंदे

चळवळ राबवुन प्रत्येकाने लसीकरण पुर्ण करावे : रवि शिंदे

वरोरा येथे महिला बचत गट मेळावा व कोरोना जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

वरोरा/चळवळ राबवुन प्रत्येकाने लसीकरण पुर्ण करावे,महिलांनी कोरोना योध्दा बणून कार्य करावे,गाव कोरोना मुक्त ठेवावे,प्रत्येक घर आर्थीकदृष्ट्या सक्षम व्हावे,या चतु:सुत्रीला अंमलात आणा असे प्रतिपादन दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवि शिंदे यांनी १९ जुलै ला स्थानिक दादासाहेब देवतळे शेतकरी भवन येथे आयोजित महिला बचत गट मेळावा व कोरोना जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमात केले.

यावेळी दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवि शिंदे,संचालक डॉ.विजय देवतळे,सामाजिक कार्यकर्ता दत्ताभाऊ बोरेकर,सरपंचा नर्मदाताई बोरेकर,वरोरा वि.का.सह.संस्थेचे वामन कुरेकर,दहेगाव सेवा सह.संस्थेचे विलास ढगे,जामगाव सेवा सह.संस्थेचे संजय घागी,मार्डा सेवा सह.संस्थेचे संतोष आगलावे,एकार्जुना सेवा सह.संस्थेचे पुरुषोत्तम थेरे,तुळाणा सेवा सह.संस्थेचे नथ्थु कष्टी आदी उपस्थित होते.दि.चंद्रपुर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत तथा संचालक मंडळाच्या निर्णयानुसार ५३ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

तालुक्यातील प्रगती महिला बचत गट,दहेगाव,रेणुका महिला बचत गट,बोर्डा,निर्मलमाता महिला बचत गट, मोहबाळा,प्रगती महिला बचत गट,मोहबाळा,रेणुकामाता महिला बचत गट,जामगाव,शारदा महिला बचत गट, करंजी,महालक्ष्मी महिला बचत गट,करंजी या बचतगटांचा कर्ज वाटपात सहभाग आहे.सोबतच स्व.राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजनेअंतर्गत आसीफ पठाण,ज्ञानेश्वर भुते,विजया डाखोरे,सुवर्णा भुते यांना व्यवसायाकरीता कर्ज वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती होती.

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love