Friday, September 24, 2021
spot_img
HomeMain-sliderचिकटगाव येथे ग्रामीण सामाजिक विकासावर आधारित व्याख्यान

चिकटगाव येथे ग्रामीण सामाजिक विकासावर आधारित व्याख्यान

औरंगाबाद: वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आदर्श गाव पाटोदा गावाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे ग्रामीण सामाजिक विकासावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानांच्या माध्यमातून सामाजिक विकासावर त्यांनी भर देत गावकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन करत ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच तरुणांना मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. येथील ग्रामपंचायत चे पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ आदर्शगाव पाटोदा येथे भेट देण्यासाठी गेले असता त्यांनी भास्करराव पेरे पाटील यांना गावात येण्याचे निमंत्रण दिले होते.

यावेळी चिकटगावचे सरपंच सौ मंगल बाळू वाघ, उपसरपंच उत्तमराव निकम, ह भ प. रविन्द्र महाराज, माजी सरपंच R.K. पाटील, राजेंद्र पाटील निकम, लोणी गावचे सरपंच पती रामभाऊ आवचिते, उपसरपंच आप्पासाहेब जाधव (लोणी खुर्द), उपसरपंच अमोल सोनवणे(भादली), सदस्य राधाकृष्ण सोनवणे (लोणी खुर्द), यांच्यासह गावचे ग्रामपंचायत सदस्य सोसायट्यांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते तरुण मित्र मंडळ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तमराव निकम यांनी केले तर राजेंद्र पाटील निकम व ग्रामसेवक केशव सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा भागवत निकम यांनी केले.तर आभार प्रदर्शन बाबासाहेब निकम यांनी केले.

औरंगाबाद ब्युरो चीफ हसन सैय्यद लोणीकर

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love