Wednesday, August 17, 2022
spot_img
HomeMain-sliderजिंतुर तहसील कार्यालयाच्या गेटवरच वाहन पार्क करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही

जिंतुर तहसील कार्यालयाच्या गेटवरच वाहन पार्क करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही

प्रतिनिधी – सचिन रायपत्रिवार

जिंतूर- येथील तहसील कार्यालयाच्या ऐन गेटवरच वाहनाची पार्किंग करणाऱ्या एका हुल्लडबाज वाहनधारकास ( MH06AZ6927)तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी ५०० रुपयाचा दंड लावून कार्यवाही केली.
जिंतूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ऐन गेटवर शुक्रवार दिनांक २९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सावरगाव येथील केशव खबडे यांनी स्वतःचे चार चाकी वाहन नियमबाह्यरित्या लावले होते या दरम्यान योगशिक्षक गजानन चौधरी हे त्यांच्या गाडीने तहसील कार्यालयात जाण्यासाठी आले. यानंतर लगेचच तहसीलदार सखाराम मांडवगडे यांचे वाहन देखील तहसील कार्यालयात प्रवेश करण्यासाठी आले. तरीदेखील संबंधित वाहनधारक त्या ठिकाणी बराच वेळ आला नाही. यामुळे तहसीलदार यांना बराच वेळ मनस्ताप सहन करावा लागला. अखेर त्यांना गाडीच्या खाली उतरून बाई कार्यालयापर्यंत जावे लागले. योगशिक्षक गजानन चौधरी यांनी संबंधित वाहनधारकाची तोंडी तक्रार तहसीलदार मांडवगडे यांच्याकडे केली. यानंतर मांडवगडे यांनी सावरगाव येथील वाहन मालक केशव खबडे याच्यावर दंडात्मक कार्यवाही केली.
चार चाकी व दोन चाकी वाहनधारकांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार्किंगचे नियम पाळले पाहिजेत, असे मत तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Ankur Upadhayay on Are you Over Sensitive?
Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love