Thursday, August 5, 2021
spot_img
HomeMain-sliderजिंतुर येथे बैलगाडी मोर्चाला मोठा प्रतिसाद, काँग्रेस का हात आम आदमिके साथ।

जिंतुर येथे बैलगाडी मोर्चाला मोठा प्रतिसाद, काँग्रेस का हात आम आदमिके साथ।

जिंतुर / केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात शहरात भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा मोंढा परिसरातून तहसील कार्यालय पर्यंत येऊन तहसीलदार सखाराम मांडवगडे यांना निवेदन देण्यात आले.सदरील मोर्चाचे आयोजक कॉंग्रेस नेते सुरेश भैय्या नागरे यांनी केंद्र सरकारवर इंधन महागाई विरोधात टिका करत भाजपा जातीपातीच्या राजकारणात करत असून मी काँग्रेस पक्षाचे आदेशा ने परभणी येथून निवडणूक लढविली अभी टायगर झिंदा है.

असे म्हणत जिंतूर येथे पण मी निवडणूक लढविणार असल्याचे ठामपणे जाहीर जिंतूरच्या विकासा साठी काम करणार.यावेळी प्रेरणाताई वरपुडकर यांनी केंद्र सरकार वर टीका करत इंधन व गोडतेल चे भाव गगनाला पोहोचले असून सर्वसामान्यांचा संसार केंद्र सरकारचे महागाईच्या धोरणामुळे संकटात सापडले असल्याचे सांगितले केंद्र सरकारने तात्काळ दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस कमिटीच्या वतीने जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

या भव्य मोर्चात सुरेशभैया नागरे,प्रेरणाताई वरपुडकर,ता अध्यक्ष गणेश काजळे,नागसेन बिरर्जे,बासू पठाण,प्रदिप देशमुख,शांताबाई बन,गंगुबाई देशमुख,रामभाऊ घुगे’ केशवराव बुधवंत,कृष्णा राऊत दुधगावकर,अर्जुन वजीर प्रकाशराव देशमुख,विजय राठोड,रामप्रसाद माघाडे,भागवत कानपुरे,अनिल घनसावध’बाळासाहेब खंडागळे सिराज खान,फिरोज भाई मिस्तरी,टीका खान पठाण,सय्यद हाशम,जावेद सिद्दीकी,जाबेर भाई,नगरसेवक संतोष आंधळे व शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.

प्रतिनिधी- सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love