Saturday, July 31, 2021
spot_img
HomeMain-sliderजिंतूर येथे श्री संचारेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत सोहळा संपन्न,

जिंतूर येथे श्री संचारेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत सोहळा संपन्न,

जिंतूर/दिनांक १५ जून २०२१ रोजी श्री संचारेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरूवात ॲानलाईन गुगल मीट च्या माध्यमातून व प्रातिनिधीक स्वरूपात ५ विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व नविन पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रविकुमार पेशकार (कार्यवाह स्थानिक समन्वय समिती) प्रमुख पाहुणे म्हणून ॲानलाईन गुगल मीट द्वारा जिॅतूर चे गटशिक्षणाधिकारी मा. सुभाषजी आमले साहेब तसेच शाळेत प्रत्यक्ष उपस्थिती श्री वसंतराव पुराणिक (शालेय समिती अध्यक्ष) मुख्याध्यापक श्री प्रकाश जोशी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ विजयमाला फड यांनी केले तर प्रास्ताविक शिवाजी सोमोसे यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती उषा खराबे यांनी केले.जिंतूर चे गटशिक्षणाधिकारी मा.सुभाषजी आमले साहेब यांनी शाळेतील नवागतांचे ॲानलाईन स्वागत सोहळा या कार्यक्रमास गुगल मीटद्वारा शुभेच्छा दिल्या. तसेच “ॲानलाईन शिक्षण पध्दतीमध्ये नवनविन उपक्रम शाळा राबवते व संस्कारक्षम भावी नागरिक (विद्यार्थी ) घडवते.पुढेही असेच उपक्रम राबवावेत”.असे ते म्हणाले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी सोमोसे,किरण नाईक,बाळासाहेब ठोंबरे,संजय गायकवाड,उषा खराबे,विजयमाला फड,रूपाली सोनसळे या सर्व शिक्षकवृंदानी प्रयत्न केले.

प्रतिनिधी- सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love