Monday, August 2, 2021
spot_img
HomeEducationजिजामाता पब्लिक स्कूल सोनपेठ ची तेजस्विनी साबळे १००% गुण मिळवून सर्वप्रथम राज्यात,तर...

जिजामाता पब्लिक स्कूल सोनपेठ ची तेजस्विनी साबळे १००% गुण मिळवून सर्वप्रथम राज्यात,तर शाळेची १००% निकालाची परंपरा कायम।

सोनपेठ / सोनपेठ,जि.परभणी येथील जिजामाता स्कूल ने निकालाची सर्वोच्च परंपरा कायम ठेवून शाळेची विद्यार्थिनी कु. तेजस्विनी परमेश्वर साबळे या विद्यार्थीनीने 500/500  गुण 100% मिळवून शाळेसह राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे.सोनपेठ तालुक्यातून सर्वप्रथम 100% टक्के गुण मिळवण्याचा आज पर्यंतचा इतिहास झाला असून शाळेच्या यापूर्वीच्या सर्व 5 बॅचचा निकाल सुद्धा 100 टक्के लागलेला आहे.

सोनपेठ सारख्या अतिशय ग्रामीण भागात शालांत परीक्षेत गुणवत्तेचा पॅटर्न जिजामाता पब्लिक स्कूलच्या माध्यमातून निर्माण झाला असून याच शाळेतून 97.80 % गुण मिळवून वेदांत मनोज हालगे याने द्वितीय तर 95.40% मिळवून श्रद्धा अंगद मस्के या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शाळेतील 35 विद्यार्थ्यांपैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून 14 विद्यार्थी,80 पेक्षा जास्त 13,तर 75 पेक्षा जास्त 06,आणि 60 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणारे 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव,प्रा.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे,प्राचार्य ए.जे अजय सर,मुख्याध्यापक गणेश जयतपाळ,सौ.विद्या बदाले,(धोंडगे),वर्गशिक्षिका सौ.अश्विनी चव्हाण (रोडे),सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love