Saturday, December 10, 2022
spot_img
HomeMain-sliderजि प शाळेच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्याची मागणी

जि प शाळेच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्याची मागणी

पूर्णा/शहरातील माध्यमिक जि प च्या शाळेच्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करून त्याचे पक्के बांधकाम करण्यात येत आहे त्यामुळे सदर बांधकाम काढून देण्याची मागणी नपच्या मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या कडे एका निवेदना द्वारे शाळेच्या वतीने करण्यात आली आहे
पूर्णा शहरातील बस स्टॅण्ड रोड असलेल्या माध्यमिक जिल्हा परिषदेच्या शाळेची भरपूर जागा आहे .ही जागा मुख्य रस्त्यावर असल्याने त्या जागेवर अनेकांची नजर होती आणि याचा फायदा घेत या जागेवर अतिक्रमण करण्यात आले सदर प्रकरण न्यायालयात गेले होते न्यायालयाने शाळेच्या बाजूनी निकाल दिला आहे तरी पण या जागेवरचे अतिक्रमण निघाले नाही उलट या जागेवर बांधकाम परवानगी नगर परिषद पूर्णा तर्फ देण्यात आली त्यामुळे आता अतिक्रमण धारक पक्के बांधकाम करत असल्याचे पुन्हा एकदा शाळे तर्फ या बाबत निवेदन देऊन ही नपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.महावीर नगर येथील रहिवासी इलियास शे अजिज यानी अतिक्रमण केलेल्या जागे वर पक्के बांधकाम केले आहे त्यामुळे त्यास देण्यात आलेला बांधकाम परवाना तत्काळ रद्द करून सदर अतिक्रमण काढून देण्याचे निवेदन पुन्हा एकदा दि 7 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी अजय नरळे यांना शाळे तर्फ देण्यात आला आहे या निवेदना वर शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सर,शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मोहन लोखंडे,उपाध्यक्ष प्रकाशदादा कांबळे यांचे स्वाक्षऱ्या आहे

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Ankur Upadhayay on Are you Over Sensitive?
Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love