Sunday, August 1, 2021
spot_img
HomeMain-sliderज्येष्ठ धम्म उपासक कृष्णानंद अंबाजी कऱ्हाळे यांचे निधन.....!

ज्येष्ठ धम्म उपासक कृष्णानंद अंबाजी कऱ्हाळे यांचे निधन…..!

पूर्णा दिनांक 19 भीम नगर येथील सेवानिवृत्त रेल्वे लोको पायलट व जेष्ठ धम्म उपासक कृष्णानंद अंबाजी कऱ्हाळे यांचे वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी धमम कार्याला वाहून घेतले होते.भारतातील व विदेशातील बौद्ध धम्म स्थळाला त्यांनी भेटी दिल्या होत्या.श्रीलंका या बौद्ध राष्ट्राला त्यांनी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित धम्म पर्यटन सहलीत सहभागी झाले होते.भारतीय रेल्वे मध्ये कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची नोंद होती.भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संघटक म्हणून त्यांनी यशस्वीपणे कार्य केले.त्यांच्या पश्चात तीन मुले व दोन मुली आहेत.भारतीय बौद्ध महासभेचे शहर सचिव व पत्रकार बौद्धाचार्य अमृत कराळे यांचे ते वडील होते.बौद्ध स्मशान भूमी मध्ये अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये दुपारी साडेबारा वाजता त्यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी भंते पयावश,भन्ते संघरत्न यांनी अंतिम विधी पार पाडला या वेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love