Wednesday, August 4, 2021
spot_img
HomeMain-sliderदिव्यांगांच्या विविध प्रश्नांविषयी उपमहापौरांना निवेदन,

दिव्यांगांच्या विविध प्रश्नांविषयी उपमहापौरांना निवेदन,

दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्न संदर्भात भाजपा कार्यकर्ते दगडु आप्पा गवळी यांनी उपमहापौर भगवान आप्पा गवळी यांची भेट घेऊन दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नाविषयी चर्चा केली.तसेच दिव्यांग व्यक्तींचे विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे अशी मागणी दगडु आप्पा गवळी यांनी केली आहे.दगडु गवळी यांनी धुळे शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत नसल्याचे उपमहापौर यांचे लक्ष वेधले.

दिव्यांग व्यक्तींसाठी कुटुंबप्रमुखाची अट न लावता ५०% घरपट्टीची सवलत,मनपा मालमत्ता करातून दिव्यांग व्यक्तींसाठी ५ टक्के निधी खर्च करणे,विनाअट घरकुल योजनेची अंमलबजावणी करणे व अशा अनेक दिव्यांग कल्याणकारी योजनांची धुळे शहरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.याविषयीचे निवेदन देण्यात आले. वरील सर्व अर्ज व निवेदन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे प्रदेश सदस्य महेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.यावेळी नगरसेवक नरेश आप्पा चौधरी,नगरसेवक रंगाभाऊ ठाकरे,विजय गवळी.प्रमोद पाटील संदीप बैसाने, धुळे दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील घटी, यशवंत पाटील, सजंय पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी/प्रदीप देशमुख जिल्हा जळगांव

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love