Friday, September 24, 2021
spot_img
HomeMain-sliderदोनशे किमी सायकलिंग करून BRM शताब्दी वर्ष जिंतूरात साजरा, ०९ सायकल स्वारांनी...

दोनशे किमी सायकलिंग करून BRM शताब्दी वर्ष जिंतूरात साजरा, ०९ सायकल स्वारांनी नोंदवला सहभाग, जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबचा उपक्रम

जिंतूर: जिंतूर शहरातील जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबच्या वतीने फ्रान्स देशात सुरू झालेल्या BRM लांब पल्ल्याच्या सायकलिंगला शंभर वर्षे पूर्ण झाल्यामुळे रविवार १२ सप्टेंबर रोजी २०० किमी सायकलिंगचे आयोजन करून BRM शताब्दी वर्ष साजरा करण्यात आला. यात ०९ सायकल स्वारांनी सहभाग नोंदवला होता.

फ्रांस देशात इसवी सन 1921 साली BRM लांब पल्ल्याच्या सायकलिंगला सुरुवात झाली होती. 11 सप्टेंबर 2021 रोजी सदरील लांब पल्ल्याच्या सायकलिंगला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने BRM च्या शताब्दी वर्षानिमित्त संबंध जगभरात 11 व 12 सप्टेंबर रोजी 200 किमी शताब्दी राईडचे आयोजन करण्यात आले होते. जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबच्या वतीने हे BRM च्या शताब्दी वर्षानिमित्त जिंतूर-जालना-जिंतूर दरम्यान रविवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी ६:२२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून २०० किमी लांब पल्ल्याच्या सायकलिंगचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी माजी सैनिक संजय दराडे आणि संदीप भारशेखर यांनी सायकल स्वारांना झेंडी दाखवली. या लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी सायकल स्वारांना १३:३० तासांचा निर्धारित वेळ देण्यात आला होता. सहभागी सायकल स्वारांनी निर्धारित वेळेच्या आत २०० किमीचा पल्ला गाठून शताब्दी वर्ष साजरा केला.

या लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी गंगाखेड येथील सूर्या बडवने, परभणी येथील संतोषकुमार चव्हाण, येलदरी येथील प्रमोद भालेराव, दिलीप लोखंडे, बोरी येथील सचिन भिसे, जिंतूर येथील ज्ञानबा मापारी, शेख अलीम, पठाण नजीर, शहेजाद खान आदी ०९ सायकल स्वारांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी सहभागी सायकल स्वारांचा क्लबचे सीआर व्यंकटेश भुरे, देवेंद्र भुरे, पवन कालापाड, यासीन खान, किशोर वानपसारे, शेख शाहरुख, जगदीश चिंचोले, रमेश लहाने, तुलसीराम कानाडे, राहुल भिसे, मारोतराव भिसे, महेश लोखंडे, यज्ञेश मापारी आदींनी पुष्पहाराने गौरव केला.

प्रतिनिधी- सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love