Friday, September 24, 2021
spot_img
HomeMain-sliderनांदगाव तालुक्यातील जवळकी शिवारातील जवळपास 150 शेतकरी अतिउरुष्टी च्या लाभ मिळून सुद्दा...

नांदगाव तालुक्यातील जवळकी शिवारातील जवळपास 150 शेतकरी अतिउरुष्टी च्या लाभ मिळून सुद्दा लाभा पासून वंचित

नांदगाव-महाराष्ट्र/सविस्तर बातमी अशी की मागील वर्षी 2019।2020 ह्या हंगामात संपूर्ण तालुक्यात अतिउरुष्टी झाली होती ह्या अतिउरुष्टी चे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना शासकीय मदत करण्याचे शासनाचे आदेश होते जेणे करून संबंधित शेतकऱ्यांना पुढिल शेती करण्यास आर्थिक मदत होईल मात्र नांदगाव तालुक्यातील जवळकी शिवारातील 150 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ अद्याप पर्यंत मिळालेला नाही शासनाने तयार केलेल्या यादीत संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे त्यांच्या नावे जाहीर झालेली रक्कम देखील आहे मात्र बँक खात्यात अद्याप पर्यंत ही रक्कम जमा झालेली नाही । शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली असता आम्ही बँकेला यादी आणि पैसे वर्ग करून दिलेले आहेत आता आमची जबादारी संपली अशी उत्तरे देण्यात आली।आम्ही वेळोवेळी लागणारे सर्व कागदपत्रे जमा केले आहेत तरी आम्हाला पुन्हा पुन्हा फिरवण्यात येतंय असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे।
आम्ही सदर यादी माननीय प्रांत कार्यालय,तहसील कार्यालय सुद्धा देऊन तिचा पाठपुरावा केला मात्र आम्हाला अद्याप पर्यंत काहीही मिळाले नाही आमची गत देव देतंय आणि कर्म नेतय आशी झालीय
नांदगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार श्री सुहास अण्णा कांदे साहेब यांनी स्वतः लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी सर्व शेतकरी वर्गा कडून विनंती करण्यात येते।

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love