Tuesday, June 15, 2021
spot_img
HomeMain-sliderनांदेड महामार्ग पोनी केंद्रे यांचे मार्गदर्शन शिबिर संपन्न,

नांदेड महामार्ग पोनी केंद्रे यांचे मार्गदर्शन शिबिर संपन्न,

जिंतूर–येथील रस्ते महामार्ग पोलीस चौकी येथे नांदेड महामार्ग पोलीस निरीक्षक अरुण केंद्रे यांनी बैठक घेऊन पोलीस अंमलदार यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. पोलीस अंमलदार यांनी कर्तव्य बजावत असताना वाहन चालक वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. दुचाकी वाहन चालक यांनी हेल्मेट घातले नसेल तर त्याच्यावर दंड आकारावा. कारण दुचाकीच्या अपघातात आत्तापर्यंत सर्वात जास्त मृत्यू हे डोक्याला मार लागूनच झालेले आहेत.

वाहन चालक दारू पिऊन वाहन चालवत असेल तर त्यावरही कारवाई करावी जेणेकरून तो वाहन चालक पुन्हा दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या नाही. तसेच महामार्गावर जे मृत्युंजय दूत आपण नेमलेले आहेत त्यांना वारंवार भेटून अपघात झाल्यास काय व कशी मदत करायची याबाबत डॉक्टरांकडून त्यांना प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून जखमींना ताबडतोब उपचार मिळून त्यांचे प्राण वाचतील.

कर्तव्य बजावत असताना वाहनचालकांना इन्शुरन्स बाबत माहिती द्यावी तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा बाबत प्रबोधन करावे. इंटरसेप्टर कार व वाहतुकीच्या नियमांबाबत महामार्गावर असलेल्या गावात जाऊन जनजागृती करावी,महामार्गावर कमीत कमी अपघात होतील याबाबत सर्व त्या उपाययोजना कराव्यात ई.बाबत मार्गदर्शन केले तसेच सध्याच्या कोरोना काळात पोलीस अंमलदार यांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असेही सांगितले.यावेळी महामार्ग पोलीस केंद्र जिंतूर येथील पोलीस अंमलदार तसेच प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राठोड,पोलीस उपनिरीक्षक महाजन इत्यादी हजर होते.

प्रतिनिधी- सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Spread the love