Monday, August 2, 2021
spot_img
HomeMain-sliderनोकरीचे आमिष दाखवत फसवणूक एक आरोपी जाळ्यात तर दोन फरार।

नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक एक आरोपी जाळ्यात तर दोन फरार।

जळगाव / प्रतिनिधी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तोतयागिरी करत सुमारे 21 लाख 84 हजाराची फसवणूक करणाऱ्या एकाला रामानंदनगर पोलीसांनी अटक केली आहे.तर दोन जण फरार आहेत.या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकित गोर्वधन भालेराव वय 28,रा.बौध्दवाडा मुक्ताईनगर जि.जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रासूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार,जळगाव शहरातील अमोल प्रदीप चौधरी वय 35,रा.वसई याला नोकरी देण्याचे प्रलोभन देवून सुमारे 4 लाख 68 हजाराची फसवणूक केली.

सोबत हेमंत सुभाष भंगाळे वय 33 रा.नेहरू नगर मोहाडी हात गाडी व्यवसायिक आहेत.त्यांना 4 लाखात गंडविले, पुर्वा ललित पोतदार वय 32,रा.देहू रोड पुणे यांना 7 लाख 30 हजारात,देवेंद्र सुरेश भारंबे वय 36,रा.शिवकॉलनी भुसावळ यांना 2 लाख 40 हजारात,नितीन प्रभाकर सपके वय 45,रा.आनंदनगर मोहाडी रोड यांना 12 लाख 60 हजार रूपये असे एकुण 29 लाख 84 हजार रूपयांची फसवणूक केली.

आरोपी अंकित भालेरावने आपले वैभव राणे असे बनावट नावाने ही फसवणूक केली आहे.यासाठी त्याची बहिणी स्वाती गोवर्धन भालेराव वय-30 आणि त्याची आई रत्नमाला गोवर्धन भालेराव वय 62,रा.मुक्ताईनगर असे फसवणूक करणाऱ्यांची नावे आहे.तसेच अमोल चौधरी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या गुन्ह्यात संशयित आरोपी अंकित भालेराव याला अटक केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी हे करत आहे.

प्रतिनिधि/प्रदीप देशमुख जिल्हा जळगाव  

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love