Thursday, August 5, 2021
spot_img
HomeEducationन्यू हायस्कूल तलवाडा शाळेचा निकाल शंभर टक्के।

न्यू हायस्कूल तलवाडा शाळेचा निकाल शंभर टक्के।

औरंगाबाद / कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा दहावी साठी मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल घोषित करण्याचा निर्णय घेतला होता.त्या अनुषंगाने,मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद, संचलित.न्यू हायस्कूल तलवाडा,ता.वैजापूर या प्रशालेतून शासनाच्या आदेशानुसार झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षे करिता एकूण 42 विद्यार्थ्यी प्रविष्ट झाले होते.

त्यामध्ये 41 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविण्यात यश संपादन केले.आणि एका विद्यार्थ्यांने प्रथम श्रेणी मध्ये यश मिळविल्याने या प्रशालेतून प्रविष्ट झालेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.रोकडे दिपाली सुभाष 89 टक्के,नरवडे कल्याणी सत्यवान 88.60 टक्के,गवांदे प्रतिक बाळू 86.40 टक्के अशाप्रकारे या तीन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविण्यात यश मिळवले आहे.

या यशा बद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक संजय खरात,शा.स.अध्यक्ष जनार्दन मगर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भागिनाथ दादा मगर,पं.स.चे.माजी उपसभापती राजेंद्र मगर,विनोद मगर,दादाभाऊ मगर,अजगर पठाण,भाऊसाहेब मगर, सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ मगर,किशोर मगर,ग्रामपंचायत सदस्य शांताराम मगर यांच्यासह प्रशालेचे शिक्षक के.एस.नाडगौडा,सुरेश गायकवाड,तुषार शिरसाठ,आण्णासाहेब नलावडे,रामकृष्ण अंहकारे,नरेंद्र पोटे, जयप्रकाश पवार,राजेंद्र जोर्वेकर,बबनराव निकम,हसन सैय्यद,शंकर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

औरंगाबाद ब्युरो चीफ/ हसन सैय्यद

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love