Thursday, August 5, 2021
spot_img
HomeMain-sliderपंढरपुर वारी बंद करणाच्या शासनाचा संतांकडून निषेध,17 जुलैला तहसील समोर भजन आंदोलन,

पंढरपुर वारी बंद करणाच्या शासनाचा संतांकडून निषेध,17 जुलैला तहसील समोर भजन आंदोलन,

फैजपूर / संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पंढरपूर वारीची शेकडो वर्षांपासूनची परंपरा खंडित करण्याचा घाट सत्तारूढ शासनाने घातला आहे.शिस्तप्रिय असलेल्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ हभप बंडातात्या महाराज यांना शासनाने अटक करून स्थानबद्धतेची केलेली कारवाई,वारकरी संप्रदायाच्या पताका,ध्वज जप्त करून त्यांचा गणवेश बदलण्याची दिलेली तंबी यासह अनेक बंधन लागली जात आहेत हे निषेधार्ह असून महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारी बाब असल्याने याचा अखिल भारतीय संत समिती,अखिल भारतीय सनातन सत्पंथ,स्वामीनारायण पंथ,महानुभाव पंथ,दिगंबर महाराज संस्थान,वारकरी संप्रदाय,विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.या प्रकाराच्या निषेधार्थ शनिवार,17 जुलै रोजी सर्व तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय खजिनदार महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती मंगळवारी दुपारी दोन वाजता सतपंथ मंदिर संस्थान या ठिकाणी पत्रकार परीषद झाली.

या पत्रकार परीषदेत अखिल भारतीय संत समिती कोषाध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज,अखिल भारतीय संत समिती सदस्य तथा खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरूषोत्तम दासजी महाराज,महानुभाव पंथाचे सुरेश शास्त्री मानेकर बाबा,स्वामीनारायण गुरुकुल संस्थांचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दासजी,दिगंबर महाराज संस्थान अंजाळे येथील हभप धनराज महाराज,हभप नरेंद्र नारखेडे,विश्व हिंदू परीषदेचे कायम कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी,विश्व हिंदू परीषदेचे नारायण घोडके,विनोद उबाळे,भुसावळ जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, अ‍ॅड.कालिदास ठाकूर,बजरंग दल शहराध्यक्ष लोकेश कोल्हे यांची उपस्थिती होती.

वारी बंद करणार्‍या शासनाचा निषेध कोरोनाच्या महाभयंकर लाटेत पंढरपूर पोटनिवडणूक झाली यावेळी राजकीय पदाधिकार्‍यांसह हजारो लोकांची गर्दी तेथे होती मात्र त्यावेळी शासनाने कोणतेही बंधन घातले नाही.आज देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असून हॉटेल्स,मॉल,दारूची दुकाने,बाजारपेठा,लग्न समारंभ,सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रासपणे सुरू असताना शेकडो वर्षापासूनची,लाखो शिस्तप्रिय वारकर्‍यांची पांडुरंगाची पंढरपूर पायी वारीची प्रथा शासन बंद करीत असून याचा आम्ही सर्व जाहीर निषेध करीत असल्याचे संतांनी म्हटले आहे.स्वामीनारायण संस्थानचे उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोर दासजी,खंडोबा देवस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समिती सदस्य महामंडलेश्वर पुरूषोत्तम दासजी महाराज,महानुभाव पंथाचे सुरेश शास्त्री मानेकर बाबा,हभप धनराज महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले.

प्रदीप देशमुख भुसावळ

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love