Saturday, December 10, 2022
spot_img
HomeMain-sliderपूर्णेत शिवसेना गणेश फेस्टिवल चे बक्षिस वितरण संपन्न

पूर्णेत शिवसेना गणेश फेस्टिवल चे बक्षिस वितरण संपन्न

पूर्णा, प्रतिनिधी…..
शिवसेना शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम यांच्या मुख्य संयोजनाखाली संपन्न झालेल्या पूर्णा शिवसेना गणेश फेस्टिवल चा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला,अक्षरशः दीड ते दोन लाख रुपयांची पारितोषिके यावेळी गणेश मंडळानी पटकावली तर खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी प्रत्यक्ष उपस्तिथ राहत गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना स्वतःकडून नगदी स्वरूपात हजरोंची बक्षिसे प्रदान केली.
शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम यांच्या शिस्तबद्ध नियोजनातून पार पडलेल्या या फेस्टिवल मध्ये छ.शिवाजी गणेश मंडळ,श्रीकृष्ण गणेश मंडळ,ओम गणेश मंडळ,आनंदनगर गणेश मंडळ,महावीर गणेश मंडळ,राजस्थान गणेश मंडळ,वाल्मिक गणेश मंडळ,त्रिशूल गणेश मंडळ,स्वस्तिक गणेश मंडळ आदी मंडळांनी बक्षिसांची लयलूट केली,त्यांच्या देखव्यानी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते, स्थानिक देखावा,धर्मिक देखावा,उत्कृष्ठ गणेशमूर्ती,शांततापूर्ण गणेश मंडळ,सामाजिक देखावा,आदी प्रकारातील बक्षिस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय उर्फ बंडू जाधव,शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम ,डॉ विनय वाघमारे,पो नि सुभाष मारकड, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे,राजू एकलारे साहेबराव कदम,प्रा गोविंद कदम,मा. शहरप्रमुख बंटी कदम, ऍड राज भालेराव,रवी जैस्वाल,शामराव कदम,शिवव्यख्याती आरोही खंदारे आदींसह मान्यवर उपस्तिथ होते,यावेळी बाल व्याख्याती कु खंदारे हिने आपल्या कणखर आवाजात छत्रपतींचे कार्य विशद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शहरप्रमुख मुंजा उर्फ संकेत कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रा जगन्नाथ कदम,ज्ञानोबा कदम,प्रा दत्ता कदम, विनायक कदम,पप्पू कदम,कृष्णा कदम,गोपाळ कदम,बाला कदम,अंकित कदम,विष्णू कदम,विशाल कदम,बालाजी सुर्वे,अक्षय काहाते, सोम शिराळे, विकास वैजवाडे, विद्यानंद तेजबंद आदींसह शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Ankur Upadhayay on Are you Over Sensitive?
Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love