Monday, August 2, 2021
spot_img
HomeMain-sliderपेट्रोल,डिझेल,गॅस व खाद्य तेलाच्या प्रचंड महागाई विरोधात काँग्रेस पक्षाकडून बोरी शहरात भव्य...

पेट्रोल,डिझेल,गॅस व खाद्य तेलाच्या प्रचंड महागाई विरोधात काँग्रेस पक्षाकडून बोरी शहरात भव्य सायकल रॅली

दिनांक 18 जुलै/केंद्रातील नरेंद्र मोदी यांनी जनतेला अच्छे दिनाचे दिवास्वप्न दाखवत केंद्रात स्थापन करून आज जवळपास 7 वर्षे पूर्ण होत आहेत परंतु आज या सरकारने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना पेट्रोलचे दर प्रतिलिटर 110 रुपये केले.असून डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे.घरगुती गॅस 900 वर गेला असून खाद्यतेल 180 रुपये प्रतिलिटर झाले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमती मुळे सर्वसामान्य लोकांची कंबरडे मोडले आहे.आज शेतकरी फवारणी करण्यासाठी फवारणी यंत्राला पेट्रोल घेऊ शकत नाही गॅस व खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे त्यामुळे या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 18 जुलै रोजी बोरी शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सदरील रॅली ही कौसडी फाटा ते पोलिस पेट्रोल पंप पर्यंत काढण्यात आली रॅलीमध्ये आयोजक युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नागसेन भेरजे,किसान सेलचे तालुकाध्यक्ष प्रभाकर आण्णा बोर्डीकर,जिल्हा सरचिटणीस प्रदीप राव देशमुख,माजी तालुकाध्यक्ष अंकुशराव राठोड,युवक जिल्हा उपाध्यक्ष राम देशमुख,शेख सलमान शेख चांद,माजी सरपंच दासराव कनकुटे,चांदज सरपंच अरुणराव गजभारे,पिंपळगाव गायके चे सरपंच सुरेश कानडे,मा.सरपंच विजयराव ठमके,रमेशराव कड,गणेशराव जाधव,भगवान झाडे,गंगाधरराव खिस्ते,दीपक खिस्ते,संतोष अंभोरे कैलासराव वजीर,तस्लिम कुरेशी,शेख इस्माईल,कादर भाई, सुरज कनकुटे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी-सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love