Tuesday, June 15, 2021
spot_img
HomeMain-sliderपोलीस प्रशासनाच्या साथीने मोकाट नागरिकांची आता रस्त्यावरच कोरोना चाचणी,

पोलीस प्रशासनाच्या साथीने मोकाट नागरिकांची आता रस्त्यावरच कोरोना चाचणी,

जिंतूर–सध्या शहरात पोलीस प्रशासन,नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभागाने एकत्र येत शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच अँटिजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट करण्याची मोहीम शहरातील मुख्य चौक असलेल्या शिवाजी चौकात राबवण्यात येत आहे.या मुळे अचानक राबवण्यात येणाऱ्या या चाचण्या मुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडालेली दिसून आलेली दिसून आली.

स्थानिक प्रशासनाने कितीही वेळा जनजागृती करून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी जिल्हा प्रशासनाने सूट दिलेल्या मर्यादित वेळे नंतर सुध्दा शहराच्या मुख्य मार्गावर काही मोकाट टोळके व नागरिक सुद्धा चोहीकडे फिरतांना दिसतातच.या वर आवर घालण्या साठी स्थानिक आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने एकत्र येवून शहरात मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची जागमोक्यावरच कोरोनाच्या आवश्यक दोन्ही टेस्ट केल्या जात आहे.या महिमेचे सर्वसामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

अधिकृत माहिती नुसार या मोहिमेअंतर्गत आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत 135 नागरिकांची अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट जाग्यावरच करण्यात आल्या आहेत.पोउअधीक्षक श्रवण दत्त पोनी प्रमोद पाटील,बी.बी. दडस,महिला पोलीस कर्माची संगीता वाघमारे,आरोग्य विभागाचे डॉ. जगदीश भालेराव, नगर परिषद कर्मचारी सालेह चाऊस, यांचे पथके जाग्यामोक्यावर तळ ठोकून कर्त्यव्य बजावत आहेत.अश्या तपासण्या रस्त्यावर नेहमी झाल्या तर मोकाट फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल व होणारे संकर्मन थांबेल अशी चर्चा सुजाण नागरिकातून होत आहे.

प्रतिनिधी-सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Spread the love