Tuesday, August 3, 2021
spot_img
HomeMain-slider"बुद्धकालीन प्रभावी स्त्रिया" पुस्तकाचे प्रकाशन संपन्न,जिद्द आणि मेहनत असेल तर यश हमखास...

“बुद्धकालीन प्रभावी स्त्रिया” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न,जिद्द आणि मेहनत असेल तर यश हमखास मिळते-डॉ.यशवंत खडसे

जिंतूर / सम्राट अशोक बुद्ध विहार मध्ये राजश्री शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने डॉक्टर यशवंत खडसे लिखित बुद्धकालीन प्रभावी स्त्रिया या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी रमाई मंच महिला अध्यक्षा सौ आशाताई खिल्लारे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष स्थानी अँ.कुमार घनसावध,आयु संभाजी खिल्लारे,बौद्धाचार्य शिवाजी लाटे,प्राध्यापक रमेश गुडदे,यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले.

व तसेच विचार मांडले भारतीय बौद्ध महासभा शाखा जिंतूर च्या वतीने प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी डॉक्टर यशवंत खरसे यांचा भारतीय बौद्ध महासभा आणि रमाई मंचच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना डॉक्टर खडसे म्हणाले की जीवनातील संघर्ष केल्या शिवाय काही मिळत नाही.पुस्तक लिहिणे ही एक अत्यंत अवघड प्रक्रिया असून त्यासाठी रात्र दिवस तोच ध्यास असावा लागतो.

काळा वेळेचे बंधन पाहता येत नाही तेव्हा अशी कलाकृती पुस्तक रुपाने जन्म घेते बुद्धकालीन प्रभावी स्त्रिया कशा होत्या या पुस्तकात सविस्तर माहिती खडसे यांनी लिहिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँ.कुमार घनसावंत यांनी पुस्तकातील हेमा महाप्रजापती गौतमी यशोधरा सुजाता यांच्या कौटुंबिक सामाजिक धार्मिक जीवनावर सविस्तर मांडणी केली असे सांगून कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऍड.कपिल खिल्लारे तर आभार पांडुरंग सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी साहेबराव वाकळे,अंभोरे बौद्धाचार्य खिल्लारे तसेच मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या.

प्रतिनिधी- सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love