
महसूल पोलीस व ग्रा.पं. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते अतिक्रमण
प्रतिनिधी- सचिन रायपत्रीवार
जिंतूर तालुक्यातील बोरी तांडा येथील मुस्लिम समाजाच्या कबरस्तान मध्ये इंगोले नावाच्या एका व्यक्तीने 40 आर जमिनीवर मागील अनेक वर्षापासून अतिक्रमण केले आहे. स्थानिक मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी व जमियत उलेमा चे मराठवाडा अध्यक्ष तथा अलहुदा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष
मौलाना अब्दुल जलील यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती.
जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी अतिक्रमण काढण्यासाठी जिंतूर महसूल प्रशासनाला आदेश दिले महसूल व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस फौजफाटा घेऊन अतिक्रमण स्थळावर पोहोचून पुढाकार घेत दिनांक 21 मे शनिवार रोजी अतिक्रमण काढले व तार कुंपणासाठी खड्डे खंदुन खंबे रोवण्यात आले.व दुसऱ्या दिवशी तार कुंपन घेण्यात येणार होते.
परंतु रोवण्यात आलेले खंबे अतिक्रमण धारकांकडून काढून टाकून फेकून देण्यात आले.यापूर्वीही 2020 ला अतिक्रमण काढण्यात आले होते परंतु अतिक्रमणधारकांने
पुन्हा अतिक्रमण केले आहे.या अतिक्रमण धारकाची दिवसेंदिवस मुजोरी वाढत चालली आहे.स्थांनिक ग्रामपंचायत प्रशासन या अतिक्रमण धारकावर कडक कारवाई का करत नाही असा प्रश्न स्थानिक मुस्लीम बांधवांकडुन होत आहेत.