Monday, August 2, 2021
spot_img
HomeMain-sliderभारतीय कृषि अनुसंधान परीषदेच्या 93 व्या स्थापना दिनानिमित्त नाविन्यपुर्ण प्रयोगशील शेतक-यांचा सत्कार...

भारतीय कृषि अनुसंधान परीषदेच्या 93 व्या स्थापना दिनानिमित्त नाविन्यपुर्ण प्रयोगशील शेतक-यांचा सत्कार व कृषि चर्चासत्र,

वृक्ष लागवड व सत्कारमृती शेतक-यांनी मनोगत व्यक्त केले,

वाशिम / जगातील सर्वात मोठी राष्ट्रीय कृषि प्रणाली असलेल्या तसेच संशोधन व विकासाव्दारे हरीत क्रांती व शेतीतील घडामोडीत महत्वपुर्ण भुमिका बजावलेल्या भारतीय कृषि अनुसंधान परीषद या स्वायत संस्थेचा 93 वा वर्धापनदिन 16 जुलै 2021 हा दिवस संपुर्ण देशभर विविध शेतकरी भिमुख कार्यक्रमांच्या आयोजनातुन साजरा केला जात आहे. कृषि विज्ञान केंद्र वाशिम यांच्या वतीने कृषि परीषदेच्या स्थापना दिना निमित्त नाविन्यपुर्ण प्रयोगशिल शतक-यांचा संवाद तसेच सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त संजय उखळकर तर उदघाटक सभापती पंचायत समिती रिसोड सुभाष खरात लाभले तसेच विशेष अतीथी म्हणुन प्रगतशील शेतकरी प्रल्हाद.

चोमवाल तसेच कृषि विज्ञान केंद्र वाशिमचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डाॅ.आर.एल.काळे तर तज्ञ मार्गदर्शक म्हणुन विषय विशेषज्ञ कृषि विस्तार एस.के.देशमुख,किटकशास्त्रज्ञ आर.एस.डवरे,फळबाग तज्ञ एन.बी.पाटिल,पिक शास्त्रज्ञ टि.एस.देशमुख,अर्थशास्त्रज्ञ डि.एन.इंगोली,गृह विज्ञान शाखेच्या शुभांगी वाटाने यांची सुदधा उपस्थीती लाभली.उदघाटनानंतर कार्यक्रमाची सुरुवात कृषि परीषदेच्या ब्रिद गिताने करण्यात आली.प्रास्ताविकात बोलतांना डॉ.रविंद्र काळे यांनी कृषि परीषदेच्या माध्यमातुन राष्ट्रीय संस्था,कृषि विघापिठ व कृषि विज्ञान केंद्रे तंत्राच्या प्रसारामध्ये महत्वपुर्ण योगदान देत असुन माहिती देवुन या निमित्त शेतक-यांचा सत्कारचा योग प्राप्त झाल्या बददल समाधान व्यक्त करुन गरजेनुसार शिफारशीत तंत्र अंगीकारावे असे आवहान केले.

अध्यक्ष स्थानावरुन संबोधतांना विश्वस्त संजय उखळकर यांनी कोविड काळात कृषि विज्ञान केंद्राने केलेले कार्य व कृषि परीषदेने दखल घेतल्या बददल उपस्थीतांना अवगत करुन यापुढे शेतकऱ्यांनी आपली ओळख कृषि उदयोजक म्हणुन दयावे असे आर्वजुन सांगुन पुढिल तांत्रिक व यांत्रिक शेती युवा शक्तीची असुन या दृष्टीने तांत्रिक मार्गदर्शन घ्यावे असे आव्हान केले.तर उदघाटनपर संबोधतांना सुभाष खरात यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली युवा शेतक-यांनी पुढे यावे व शेतीमध्ये प्रगती साधावी असे आव्हान केले.या निमित्त किटक शास्त्रज्ञ आर.एस.डवरे यांनी सोयाबीन,तुर या पिकावरील किड व रोग व्यवस्थापन तसेच शेंडे खुडने व तणनाशकाचा वापर याबाबतचा तांत्रिक संदेश शेतकऱ्यांना दिला.

कार्यक्रमा दरम्यान अंत्यत विकट परीस्थीतीत शेती व्यवसाय, फळबाग, नाविन्यपुर्ण शेती,पुरक व्यवसायाला चालना,प्रकी्रया उदयोग इत्यादी उपक्रमशिलते बददल पुरस्कारासाठी निवडलेल्या 12 शेतक-यांनी प्रयोगाची माहिती तसेच त्याच्या कार्याचे सादरीकरण करण्यात आले.या कार्यक्रमात सुधारीत तंत्राचा अवलंब करुन कृषि व पुरक व्यवसायाला चालना दिल्याबददल तसेच कृषि क्षेत्रातील उत्पादन वाढी करीता केलेल्या.

उलेखनिय कार्याबददल दिनकरराव भिकाजी सानप (चिंचाबा भर) विषाल विलास मानवतकर (वाडी रायताळ),योगेष सुभाशराव गारडे (गोभणी),दिलीप ज्ञानबा भालेराव (दापुरी),संतोश विष्वासराव बुंधे (पेडगाव),विलासराव पुंजाजीराव देशमुख (शेलगाव राजगुरे), शुभम खडसे (शेलु खडसे),विटठल तुकाराम ब्रम्हेकार (वरुड),रविंद्र जयाजी गायकवाड (गायवळ),सयद सलिम सयद सत्तार (वरुड तोफा),अक्षय बबनराव देशमुख (हिवरा रोहिला),विनोदराव दत्तराव देशमुख (हिवरा रोहिला),विलास तुकारामजी श्रीखंडे (शेलगाव बगाडे),सौ.सोनु श्रीनिवासराव देशमुख (करडा),सुरज वसंता सावसुंदर (कवठा),लक्ष्मण सखाराम बोरकर (रिठद),सुबोध प्रेमचंद कांबळे (पार्डी टकमोर),राजाभाउ दगडु इंगळे (अनसिंग),गणेश विष्णु महाले (कळंबा महाली),गजानन वानखडे (शिरपुर),विलास बळीराम जाधव (दापुरी),तुशार आत्मारामजी गावंडे (वरुड),भागवत विठोबा बोरकर (रिठद) येथिल शेतक-यांना सत्कार सन्मान पत्र,शाल,श्रीफळ,कृषि दैनंदिनी व वृक्ष कलम देवुन करण्यात आला.

यावेळेस शास्त्रज्ञांनी सुदधा यशकथे बाबत आपले विचार मांडुन इतर शेतक-यांनी सुदधा शेती पदधतीत बदल करावा असे सुचविले.कर्यक्रमांच्या अंती करडा प्रक्षेत्रावर मान्यवर व शेतकरी बांधवांच्या उपस्थीतीत वृक्ष लागवड करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी अथक परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.के.देशमुख तर आभार निवृती पाटिल यांनी मानले.

वाशिम/रवि अंभोरे

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love