Monday, August 2, 2021
spot_img
HomeMain-sliderभुसावळचे आमदार संजय सावकारे यांची सोशल मिडीयावर बदनामी;नगरसेवकासह पाच जणांविरोधात गुन्हा।

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची सोशल मिडीयावर बदनामी;नगरसेवकासह पाच जणांविरोधात गुन्हा।

भुसावळ / भुसावळातील घोडेपीर बाबा रस्त्यावरील फर्निचरच्या गोदामात सुरू असलेल्या गावठी दारू बनवण्याचा कारखाना पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीन दिवसांपूर्वीच उद्ध्वस्त केला होता.फर्निचर गोदामाची जागा भुसावळातील रवींद्र ढगे यांची असल्याने त्याचा संबंध थेट आमदारांचा कार्यकर्ता असा जोडून आमदार सावकारे यांची सोशल मिडीयावर (फेसबुकवर) बदनामी करण्यात आली होती.

या प्रकरणी आमदारांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेता तथा नगरसेवक दुर्गेश ठाकूर, बबलू खान,राजकिरण प्रधान,किरण विसे,उमेश चौधरी यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात भादंवि 500 व 501 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद कंक करीत आहे.

भुसावळातील गुन्हेगारी थोपवण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी भुसावळात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अवैध दारूच्या कारखान्यावर पुण्याच्या भरारी पथकाने कारवाई केल्यानंतर स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागासह स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही यानिमित्ताने प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.या अनुषंगाने आमदार संजय सावकारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

भुसावळ शहर आधीच चोरी,हाणामारी,खून व खंडणी आदी प्रकारामुळे बदनाम असून त्यातच आता दारूच्या अवैध कारखान्यावर कारवाई झाल्याने या प्रकाराला काही लोकांचा आशीर्वाद असल्याने हे अवैध धंदे सुरू होवू शकत नाही, असे पत्रात नमूद आहे.पोलीस प्रशासनाने कायद्याचा सक्त वापर करून गुन्हेगारी मोडीत काढावी व जनतेत पोलीस दलाची प्रतिमा उंचवावी,असा आशावादही पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रतिनिधी/प्रदीप देशमुख जिल्हा जळगांव

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love