Saturday, July 31, 2021
spot_img
HomeMain-sliderभोसरी जमीन प्रकरण खडसेंच्या जावयाला २६ पर्यंत ईडीची कोठडी।

भोसरी जमीन प्रकरण खडसेंच्या जावयाला २६ पर्यंत ईडीची कोठडी।

मुंबई / भोसरी भूखंडाच्या खरेदी प्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने 5 जुलै रोजी अटक केली होती.पहिल्यांदा पाच दिवस आणि नंतर आणखी चार दिवसांची ईडी कोठडी त्यांना सुनावण्यात आली असून 19 जुलैपर्यंत ईडी कोठडीत रहावे लागणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते.कोठडी संपत असल्याने त्यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले.

असता आता 26 जुलैपर्यंत ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे.ईडीचा तपास अद्याप पूर्ण न झाल्यामुळे ईडीने पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली होती. न्यायाझीश एस.एच.गवलानी यांनी गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ केली आहे.यांची कोठडी 26 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.दरम्यान,जमीन प्रकरणात यापूर्वी खडसेंची चौकशी करण्यात आली तर त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले आहे.

प्रतिनिधी/प्रदीप देशमुख जिल्हा जळगांव

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love