Tuesday, August 3, 2021
spot_img
HomeMain-sliderमनुष्यबळ विकास संस्थेचा समाज रत्न पुरस्कार प्रदिप कोकडवार यांना जाहीर

मनुष्यबळ विकास संस्थेचा समाज रत्न पुरस्कार प्रदिप कोकडवार यांना जाहीर

जिंतूर / मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार 2021 परभणी जिल्ह्यातील प्रदीप सोपानराव कोकडवार यांना जाहीर झाला असल्याची माहिती अँड कृष्णाजी जगदाळे यांनी दिली आहे.राज्यभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त देण्यात येतो त्याची घोषणा आज करण्यात आली.

असून आर्य वैश्य समाजातील महाराष्ट्र आणि वैश्य महासभेच्या माध्यमातून समाजासाठी व समाजातील शेवटच्या घटका साठी नेहमी कार्यरत असलेले आणि कोरोना संसर्ग परिस्थितीत समाजाला मदत मिळवून देण्यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन च्या माध्यमातून वैद्यकीय मदत आदी साठी सतत प्रयत्न केले.समाजाला शैक्षणिक आणि नोकरीसाठी आरक्षण मिळवून देण्याच्या कामात शासनाकडे नेहमी पाठपुरावा केल्याने शासनेकडून महसूल विभाग मार्फत सर्व्हे करण्यात आला.

त्या सर्वांची दखल घेऊन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे प्रसिद्धीप्रमुख तथा पत्रकार प्रदीप सोपानराव कोकडवार जिंतूर यांना हा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला या पुरस्काराचे वितरण गुरूपौर्णिमा दिनांक 23 जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट कृष्णाजी जगदाळे यांनी दिली आहे हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार भानुदासराव वट्टमवार दिलीप भाऊ कंदकुर्ते गोविंदराव बिडवई एकनाथराव मामडे सखाराम चिद्रवार किरण वट्टमवार आदी समाजबांधवांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिनिधी- सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love