Tuesday, August 3, 2021
spot_img
HomeMain-sliderमहामार्गावरील खराब रस्त्याची शिवूर पोलिसांनी केली रस्त्याची दुरुस्ती।

महामार्गावरील खराब रस्त्याची शिवूर पोलिसांनी केली रस्त्याची दुरुस्ती।

शिवूर,लोणी खुर्द / रस्त्यांची दयनीय अवस्था ही कायमचीच समस्या झालेली आहे,मात्र या खराब रस्त्यांकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याने डोंगरथडी पट्ट्यात खराब रस्त्यांमुळे अनेकांचे अपघातात जीव गेले तर याच खराब रस्त्यांचा फायदा घेत चोरटे वाहनांना अडवून चोऱ्या करत असल्याची घटना काही दिवसांपूर्वी  वैजापूर तालुक्यातील तलवाडा गावापासून काही अंतरावर तलवाडा-कासारी घाटात चोरट्यांनी परराज्यातील वाहनधारकाला लुटल्याची घटना घडली होती.

वाहन धारकांच्या समस्येला थोडासा हातभार शिऊर पोलिसांनी लावला बुधवार दि. 21 रोजी शिऊर बंगला येथील महामार्गावरील खड्यात भटाना येथील ग्रा.पं.सदस्य गणेश चंदवडे यांच्या मदतीने मुरुम टाकून खड्डे बुजवून टाकली.पोलिसांनी खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके,पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटीळक,अविनाश भास्कर,अमोल कांबळे,सुभाष ठोके,सिंधू शिकेटोड, आदींची उपस्थित होती.

शिऊर बंगला येथे आपघाती खड्डे होत असल्याने आपघात टाळण्यासाठीच पोलिसांनी ही मदत केल्याची कबुली सपोनि गोरखनाथ शेळके यांनी दिली.मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने यापूर्वी अनेक वेळा नाविलाजास्तव मोक्षदा पाटील पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण व कैलास प्रजापती,उपविभागीय पोलीस अधिकारी,वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवूर पोलिसांनी हद्दीतील अनेक रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम केले आहे.

कारण पोलीस विभाग अनेकदा अशी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रेरणादायक कार्य करत असतांना,मात्र संबंधित विभागाला त्यांच्याच कामाला वेळ मिळत नसावा हे किती दुर्दैव म्हणावे. शिवूर पोलीस अनेक वर्षापासून रस्त्यांवर पडलेले खड्डे वेळीच बुजवून होणारे अपघात टाळतात.त्यामुळे शिवूर पोलिसांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love