
खदीर विटेकर जिल्हा प्रतिनिधी लातुर.
लातूर दि.07/12/2022
भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून सर्वाधिक संघटन वाढविण्याचा प्रयत्न युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केलेला आहे. भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून युवा वारियर्सच्या राज्यात सर्वाधिक शाखा वाढवून संघटनात्मक कौशल्याचा ठसा त्यांनी उमठविण्याचे काम अद्यापपर्यंत केलेले आहे. यापुढील कालावधीतही भाजपा युवा मोर्चा त्याच ताकतीने संपूर्ण लातूर शहर व जिल्ह्यात युवा वॉरियर्स शाखेच्या माध्यमातून आदर्श स्वरूपाचे काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली असून महाराष्ट्रात आदर्श शहर जिल्हा व जिल्हाध्यक्ष म्हणून अजितसिंह पाटील कव्हेकरांच्या नावाची नोंद होईल असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे मराठवाडा समन्वयक तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अरूणजी पाठक यांनी केले.
यावेळी ते महात्मा बसवेश्वर चौकातील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आयोजित व्यापक आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा मिडीया पॅनलिस्ट तथा प्रदेश सचिव प्रेरणाताई होणराव, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा लातूर शहर जिल्हा नुतन प्रभारी अनिल पाटील बोरगावकर, अमोल निडवदे, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा सरचिटणीस अॅड. गणेश गोजमगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पाठक म्हणाले की, भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा पदाधिकार्यांचे काम चांगले असून या कार्याला गती देण्याचे काम भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर हे सक्रियपणे करीत आहेत. त्यामुळे भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा पदाधिकार्यांच्या पाठीशी सर्व तरूणांनी खंबीर उभे रहावे असे आवाहनही यावेळी बोलताना केले.
यावेळी या बैठकीला भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष गजेंद्र बोकण, वैभव डोंगरे, लक्ष्मण मोरे, मंडलाध्यक्ष रविशंकर लवटे, काका चौगुले, अॅड.किशोर शिंदे, हरीकेश पांचाळ, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, युवती प्रमुख अॅड.पुनम पांचाळ, प्रियंका जोगदंड, भाजपा युवा मोर्चा चिटणीस संतोष तिवारी, सुनिल राठी, राहूल भूतडा, महादेव पिटले, ईश्वर सातपुते, संतोष जाधव, अजय कोटलवार, गणेश खाडप, पंकज शिंदे, सोशल मिडीया जिल्हा संयोजक आकाश जाधव, अरूण जाधव, पृथ्वीराज पाटील, चैतन्य फिस्के, मंदार कुलकर्णी, यशवंत कदम, गौरव यादव, शाखाध्यक्ष आकाश पिटले, विश्वजीत फावडे, सहदेव बिराजदार, एकनाथ शिंदे, अमित पोतदार, वैभव कांबळे, विश्वजीत पाटील, प्रथमेश सूर्यवंशी, कृष्णा सारगे, राम पवार, अनिल सूर्यवंशी, रवि गव्हाणे, नागनाथ सरवदे, किशोर चव्हाण, विकास डुरे, राम कदम, अनिकेत साठे,विजय कांबळे, गणेश शिंदे यांच्यासह भाजपा युवा मोर्चा, युवा वॉरियर्स, मंडल कार्यकारीणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा वॉरियर्सचे काम मराठवाड्याला दिशादर्शक ठरेल – अनिल पाटील बोरगावकर
भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या युवा वॉरियर्सच्या संघटनाची संकल्पना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली व भारतीय जनता पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रदेश प्रभारी विक्रांत पाटील तसेच युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. तसेच या कार्याला व्यापकता आणण्याचे काम माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथजी मगे यांच्या मार्गदर्शखानाखाली करण्यात येत आहे. यापुढील कालावधीतही युवा वॉरियर्स सक्रीयपणे कार्य करेल आणि या कार्याची ऐतिहासिक नोंदही होइल खर्या अर्थाने ही प्रक्रीया मराठवाड्याला दिशादर्शक ठरेल अशा कामाची अपेक्षा भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा शाखेकडून आहे. असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा लातूर शहर जिल्हा नुतन प्रभारी अनिल पाटील बोरगावकर यांनी केले.