
वरोरा :
स्थानिक शेगाव बू येथे आज दि. ४ रोज रविवार ला पोलीस स्टेशन शेगाव च्या भव्य प्रांगणात विद्यार्थी युवक युवती तथा नव युवकांसाठी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन घेण्यात आला होता. यात विशेष मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध लोकप्रिय असलेले तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून जनतेला जन जागृती करून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतात. त्यामूळे स्थानिक शेगाव येथील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मिळावे या करिता यांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला… तर त्यांच्या मते विद्यार्थी हा ग्रामीण भागातील असो की शहरी भागातला असो प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करण्यासाठी आज पासून पुढच्या वाटचालीचे मुख्य धेय्य डोळ्यासमोर ठेऊन त्याची तयारी करावी.. विद्यार्थ्यांनी शैशनिक धेय्य , विद्यार्थ्यांनी शैशनिक धेय्य , तसेच राजकीय ध्येय , हे तीन मुख्य धेय्य असून यात आपल्याला कोणत्या धेय्यातून प्रगती करायची आहे हे निच्चीत करून योग्य मार्ग निवडावा .यातून देखील आपले भविष्य जिद्द , चिकाटी , आणि मेहनती च्या भरोशावर उज्वल होऊ शकते . असे प्रतिपादन श्री नितेश कराळे सर यांनी विद्यार्थ्या समोर मांडले .
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील सर्व गोर गरीब विद्यार्थ्यांना युवकांना वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्यांनी केलेली वर्ष भराची मेहनत ही मातीमोल होऊन त्यांच्या हाती निराशा व पछताप मिळतो. जर विद्यार्थ्यांचे मुख्य कौशल्य पाहून त्याला योग्य मार्गदर्शन वेळेवर मिळाले तर त्यांनी केलेली मेहनत चा लाभ त्याला नीच्चित मिळू शकते. व ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील उच भरारी घेऊ शकतात. शिवाय ते देखील सुध्दा उच्च पदावरील शासकीय अधिकारी होऊ शकतो.हेच समजाऊन सांगण्या करिता संविधान दिनाचे ओचित्य साधून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते… या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री नितेश कराळे मास्टर , वर्धा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मार्गदर्शक म्हणून श्री अविनाश मेश्राम ठाणेदार पोलीस स्टेशन शेगाव बू.., श्री महादेव सरोदे , psi , श्री किशोर पिरके psi, श्री प्रवीण जाधव psi, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..तर याचेच ओचित्य साधून परिसरातील पोलीस पाटील तसेच प्रत्येक गावात असलेली महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती चे अध्यक्ष यांनी गेल्या अनेक वर्षंपासून गावात अनेक मोलाचे कार्य केलेत व गावातील समस्या गावातच मिटवल्या व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले अश्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह , पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान वाढविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव चे कर्मचारी तसेच शांतता कमेटी शेगाव बू यांनी मोलाचे सहकार्य केले…..