Thursday, August 5, 2021
spot_img
HomeMain-sliderयावलमध्ये महावितरणच्या कर्मचान्यास धक्काबुक्की : चौघांविरोधात गुन्हा।

यावलमध्ये महावितरणच्या कर्मचान्यास धक्काबुक्की : चौघांविरोधात गुन्हा।

यावल / वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यास शिवीगाळ व धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.विरारनगर परीसरात मंगळवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास वरीष्ठ तंत्रज्ञ योगेश सुधाकर करनकर (41) व सहकारी किरण रोहिदास बागुल हे थकबाकी वसुलीसाठी गेले असता वीज ग्राहक रफीक,फरदीन,मुन्ना व एक महिला यांना वीज बिलाची एक हजार 141 रुपयांची थकबाकी भरा,असे सांगत असताना महिलेने आपल्या हातातील पाणी भरण्याच्या नळीने शिवीगाळ व मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली व उपस्थित रफीक,फरदीन,मुन्ना यांनी कर्मचारी योगेश करनकर यांची कॉलर पकडून ओढताण करून शिवीगाळ करीत धमकी दिली.योगेश सुधाकर करनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.तपास सहा.फौजदार नितीन चव्हाण करीत आहेत.

प्रतिनिधि / प्रदीप देशमुख जिल्हा जळगाव  

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love