Tuesday, August 3, 2021
spot_img
HomeMain-sliderलसीकरण केंद्रावर उपस्थितांना प्राधान्य द्या, अन्यथा केंद्रावर धिंगाणा घालू!मनसे चे गटविकास अधिकाऱ्यांना...

लसीकरण केंद्रावर उपस्थितांना प्राधान्य द्या, अन्यथा केंद्रावर धिंगाणा घालू!मनसे चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन।

वरोरा/एकीकडे सरकार लस घेण्याचे आवाहन करीत आहे तर दुसरीकडे लसीकरण केंद्रावर अतिमहत्वाच्या किंबहुना अधिकाऱ्यांचे कुटुंब तथा राजकारणी व समाजकारणी श्रीमंत लोकांना प्राधान्य देऊन सर्वसामान्यांना तासनी तास रांगेत उभे राहूनही लस मिळत मिळत नाही.अशी अवस्था वरोरा लगत बोर्डा येथील लसीकेद्रावर झाली असल्याचा आरोप मनसे नी केला आहे.कोरोना महामारीमुळे अख्ख जग त्रस्त झाले असून प्रत्येकाला आपला जीव सुरक्षित राहावं असे वाटत असते.

आरोग्य विभागाने ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात तर ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र नाही व असून जागा अपुरी पडत असेल तर गावातील शाळांमध्ये लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे.बोर्डा या गावातील जी.प.शाळांमध्ये लसीकरण केंद्राची व्यवस्था केलेली आहे.या केंद्रावर सकाळी 8.30 वाजतापासून आपल्याला लस केव्हा मिळतील यासाठी तासनी तास ताटकळत असतात.

परंतु,राजकारणी,समाजकारणी व श्रीमंत लोक वशिलेबाजी लावून आपली लसीकरणाची कामे आटोपवून टाकतात.तसेच ग्रा.प.कर्मचाऱ्यांकडे जाऊन आपली नावे नोंद करतात.17 जुलै ला बोर्डा येथील प्राथमिक शाळेत असणाऱ्या लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्यांच्या नोंदणी करण्यासाठी असलेल्या नोंदवहीत आधिच 20 ते 25 नागरिकांचे नाव लिहून असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर लसीकरण केंद्रावर मनसे वरोरा तालुका सचिव प्रशांत बदकी, यांनी विरोध केला त्यामुळे काही काळ लसीकरण केंद्रावर वातावरण संतप्त झाले होते.सदर बाब उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व सरपंच ना निदर्शनास आणून दिली.प्रत्येक केंद्रावर 100 नागरिकांचेच लसीकरण होत असल्याने इतर 75 लोकांनाच लस मिळत आहे.तर रांगेत ताटकळत असणाऱ्या लोकांना लस न घेता आल्यापाऊली परत जाण्याची वेळ येत आहे.

असाच प्रकार होत राहिला तर मनसे लसीकरण केंद्रावर धिंगाणा घालेल असा इशारा गटविकास अधिकाऱ्यांना मनसे च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देतांना मनसे वरोरा तालुका सचिव प्रशांत बदकी,कुणाल गौरकार,सचिन मांडवकर,विकी येरणे,कल्पक ढोरे,पंकज दडमल आदि उपस्थित होते.

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love