
उदगीर (प्रतिनिधी) :- येथील लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये रस्त्यावरील अपघातात चेहऱ्याला जोरदार मार बसलेल्या रुग्णावर पॅन फॅशियल फ्रॅक्चर ही अत्यंत जटिल अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे.सात तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत डोळे नाक दात या फ्रॅक्चर झालेल्या भागात २६ स्क्रू आणि प्लेट बसविण्यात आले आहेत. सात तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला ४ थ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.
देगलूर येथील एक तरुण गाडीवरून पडला होता.चेहऱ्याला ज्यादा प्रमाणात इजा झालेली होती.लाईफ केअर येथे या तरुणाचे थ्रीडी C.T. स्कॅन केले असता चेहऱ्याला फ्रॅक्चर झाला असल्याचे दिसून आले. डोळ्या खालील हाडांमध्ये फ्रॅक्चर झाल्याने डोळा खाली आला होता. तसेच दाताचा भाग आणि नाकाचे हाड या भागात अनेक फ्रॅक्चर असल्याचे तपासणी अंती दिसून आले.या अशा रुग्णावर उपचार करण्यासाठी आधुनिक उपकरण आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सह अस्थि रोग तज्ञासह प्लास्टिक सर्जन यांची आवश्यकता असते.
अपघातामुळे चेहऱ्याचे मधील भागात खूप दुखापत झाल्याने तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. लाईफ केअर हॉस्पिटल मधे सर्व सुविधा एकाच ठिकाणी असल्यामुळे तातडीने उपचार करणे शक्य झाले. या किचकट अशा शस्त्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, हैद्राबाद येथे साधारण आठ लाख रुपये खर्च आला असता आणि तेथे पोहंचे पर्यंत जीवाला धोका होण्याची शक्यता होती. रुग्ण नातेवाईकांच्या विनंतीवरून लाईफ केअर हॉस्पिटल येथे माफक खर्चात या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल साई फाऊंडेशन द्वारा डॉ आशिष विनायक पाटील, डॉ. अमित विनायक पाटील डॉ. पुजा पाटील आणि डॉक्टरांना प्रामुख्याने सहाय्य करणारे OT प्रमुख सिस्टर मेरी फिरंगे, विजय सूर्यवंशी, महेश कपाळे, निकिता सूर्यवंशी यांचे अभिनंदन करण्यात आले आहे .
उदगीर प्रतिनीधी : महादेव अनवले
Udgir येथील Life care Hospital चे Doctor’हे निव्वळ ढोंग करतेत. एखादी एक शस्त्रक्रिया यशस्वी झाली ना या पेपर मध्ये छापू का त्या पेपर मध्ये छापू असे करतेत
पण याच ऊदगीर येथील Life Care Hospital मधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे किती तरी रूग्नांचा जिव गेलाय हे कधी पाहण्याचा कुणी प्रयत्न केलाय का
निघाले एखादी एक शस्त्रक्रिया यशस्वी झाली की पेपर मध्ये छापायला
तसेच या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे भाडे तत्वावर मागवतात आणि त्यांची फिस भरण्यासाठी रुग्णांकडून कडून लाखो रुपये उकळतात