Sunday, August 1, 2021
spot_img
HomeMain-sliderलातूरमध्ये जळपास एक लाख रुपये चा गांजा पकडला पोलिसांनी,

लातूरमध्ये जळपास एक लाख रुपये चा गांजा पकडला पोलिसांनी,

लातुर/लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील विळेगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखा लातूर व देवणी पोलीसांच्या संयुक्त कारवाईत मंगळवार दि.१३ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ४ हिरवेगार गांजाची झाडे ज्याचे वजन १४ किलो असून ९८ हजार ४९० रुपये किमतीचा गांजा हा गुंगीकारक अम्ली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. संबंधित शेतमालक व भागीली यांच्या विरोधात देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघेही आरोपी फरार आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने मिळालेली अधिक माहिती अशी की, विळेगाव शेत शिवार गट नं. १०८/५ मधील शेतात सत्यवान रघुनाथ देवशेटवार व त्यांंचा भागीली दामु लक्ष्मण पाटील दोघेही राहणार विळेगाव तालुका देवणी यांनी संगनमत करून स्वतःचे फायद्यासाठी अवैध विक्री व्यवसाय करणेच्या उद्येशाने गांजाचे ४ झाडे व ओलसर व वाळलेले गांज्याच्या झाडासह वजन एकुण १४ किलो ७ ग्राम वजनाचे किंमत प्रती किलो ग्राम ७ हजार रुपये प्रमाणे एकुण ९८ हजार ४९० रुपयांचे गांजाची झाडे शेतात लागवड करून सांभाळ व रखवाली करीत असताना मिळुन आले आहेत. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर दत्तात्रेय सुर्यवंशी यांच्या फिर्यादिवरुन देवणी पोलीस ठाण्यात कलम २० (अ).२०(ब).२(ब) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५  कायद्या प्रमाणे सत्यवान रघुनाथ देवशेटवार व त्यांंचा भागीली दामु लक्ष्मण पाटील दोघेही राहणार विळेगाव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरिक्षक सी.एस.कामठेवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी, पोलीस हेडकाँस्टेबल सुर्यवंशी, पोलीस नाईक पाटील, योगी, जाधव, काझी, देवणी ठाण्याचे विनायक कांबळे, गणेश बुजारे, किर्तेश्वर बनाळे व तसेच शासकीय पंच म्हणून देवणी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सविता माडजे, सुग्रीव राजे, देवणी येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंध अजित कडतने व माणिक कांबळे, तलाठी मारुती कुकर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा धारक नयुम शेख, व व्हिडीओ ग्राफर अमरनाथ टिळे यांचासह आदींची उपस्थिती होती.
जिल्हा प्रतिनिधी : खदीर विटेकर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love