Wednesday, August 4, 2021
spot_img
HomeMain-sliderवरोरा ब्रॉडगेज मेट्रो चा थांबा द्या वरोरा भाजपची मागणी।

वरोरा ब्रॉडगेज मेट्रो चा थांबा द्या वरोरा भाजपची मागणी।

वरोरा/केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या ब्राॅडगेज मेट्रो या “ड्रीम प्रोजेक्ट” मध्ये चंद्रपूरचा समावेश करून या मेट्रोचा वरोडा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी वरोडा भाजपने नितीनजी गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ब्राॅडगेज मेट्रो प्रकल्पात अमरावती,यवतमाळ,वडसा,गोंदिया,रामटेक आदी शहरांचा समावेश करण्यात आला होता परंतु औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या चंद्रपूर,बल्लारपूरचा समावेश नसल्याने राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या दोन शहरांचा प्रकल्पात समावेश करण्याची गरज नितीनजींना प्रतिपादित केली.यामुळे चंद्रपूर व बल्लारपूर या शहरांचा प्रकल्पात समावेश करण्याचे आश्वासन गडकरीं यांनी सुधीरभाऊना दिले.

ब्राॅडगेज मेट्रो प्रकल्पात चंद्रपूरचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने महत्त्वाचे स्थान असलेल्या वरोडा रेल्वे स्थानकावर या ब्राॅडगेज मेट्रोचा थांबा देण्यात यावा अशी मागणी वरोरा तालुका भाजपाच्या वतीने बाबा भागडे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.

वरोरा तालुका हा एक विकसनशील तालुका असून या परिसरात जगप्रसिद्ध आनंदवन,दोन औष्णिक विद्युत प्रकल्प तसेच अनेक कोळशाच्या खाणी असून येथील अधिकारी व कर्मचारी तसेच व्यापारी यांना नागपूरला जाणे सोयीचे होईल.यामुळे वरोग रेल्वे स्थानकावर या ब्राॅडगेज मेट्रोचा थांबा देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love