Saturday, December 10, 2022
spot_img
HomeEducationविद्यार्थ्यांनी समाजाकडे प्रयोगशाळा म्हणून पहावे - सुधाकर कडू

विद्यार्थ्यांनी समाजाकडे प्रयोगशाळा म्हणून पहावे – सुधाकर कडू

वरोरा – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाजाकडे एक प्रयोगशाळा म्हणून पाहिले पाहिजे. तसेच समाजात घडणार्‍या प्रत्येक घटनेचे चिकित्सक रूपाने विश्लेषण केले पाहिजे असे प्रतिपादन आनंदवनाचे कार्यकर्ता तथा महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या पर्वावर आनंद निकेतन महाविद्यालयाद्वारे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मृणाल काळे, विभागीय समन्वयक, डॉ.रंजना लाड आणि प्राध्यापक राठोड उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रीय सेवा योजना गीताने झाली.सुधाकर कडू पुढे म्हणाले की आनंदवन हा विचार आणि सेवाकार्याचा एक मोठा ग्रंथ आहे येथील विचारांची ऊर्जा विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत पोहोचवावी.यावेळी विभागीय समन्वयक डॉ. रंजना लाड यांनी स्वयंसेवकांचे योगदान काय असावे यावर मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी आनंदवनातील कुष्ठबाधितांनी सुदृढ समाजासाठी बांधलेले हे महाविद्यालय म्हणजे एक ऐतिहासिक कार्य असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समाजसेवेचा वसा पुढे नेला पाहिजे असे सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.मोक्षदा नाईक यांनी, कार्यक्रमाचे संचालन आदित्य कडबे तसेच आभार वैष्णवी रणदिवे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Ankur Upadhayay on Are you Over Sensitive?
Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love