Friday, September 24, 2021
spot_img
HomeMain-sliderशाळेत लावलेली 80 झाडे अज्ञात व्यक्तीने उपटल्याने खळबळ

शाळेत लावलेली 80 झाडे अज्ञात व्यक्तीने उपटल्याने खळबळ

औरंगाबाद ब्युरो चीफ /हसन सैय्यद लोणीकर

वैजापूर/वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त श्री द्वारकानाथ इंटरनॅशनल स्कूल व काॅलेज वाकला रोड येथील शालेय आवारात काही दिवसांपूर्वी शोभिवंत झाडे व ग्रीन लाॅन्स केलेला होता. त्यापैकी 80 शोभिवंत झाडे अज्ञात व्यक्तींनी रात्रीतून उपटून टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. शालेय आवारातील फलकाचे नासधूस करून नुकसान केले आहे. सदर घटना ही शैक्षणिक संस्थे संदर्भात झाली असल्याने ज्ञान दान करण्यात येणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य अशोभनीय आहे.सुशोभिकरणासाठी लावलेली झाडे कोणत्या दृष्टीकोणातून उपटली हे विचार करणारे आहे.असे मत शाळेचे सचिव गोपीनाथ सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.सदर घटनेची नोंद शिऊर पोलीस स्टेशन येथे संस्थेचे सचिव यांनी केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ४२७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पो हे काॅं टिलकचंद पवार व विष्णू जाधव हे करत आहेत

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love